शरद पवार आमचे अमिताभ बच्चन आहेत- जितेंद्र आव्हाड

पुणे : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आमचे अमिताभ बच्चन आहेत, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. जितेंद्र आव्हाड एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

शरद पवार हे आमचे अमिताभ बच्चन आहेत. वयाची 75 वर्षे उलटून गेल्यावरही ते ज्या उत्साहाने काम करत आहेत त्याची सगळ्याच तरुणाईला भुरळ पडली आहे, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे टीका करत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आजही शरद पवार आहेत, असंही आव्हाड यांनी स्पष्ट केलं. शरद पवार यांच्यावर प्रेम करा किंवा त्यांचा तिरस्कार करा तुम्ही त्यांना टाळू शकत नाही.

35 वर्षांपासून शरद पवार यांच्यावर टीका केली जाते आहे. आधी बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे हे शरद पवारांवर टीका करत असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही घणाघाती टीका केली.

महत्वाच्या बातम्या-