Top News महाराष्ट्र मुंबई

शरद पवार हे सरकारचे मार्गदर्शक आहेत ‘रिमोट कंट्रोल’ नाहीत- उद्धव ठाकरे

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची परखड मुलाखत सामनातून वाचकांच्या भेटीला आली आहे. त्यात खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना सडेतोड प्रश्न विचारले असून उद्धव ठाकरेंनीही त्या प्रश्नांना जशाच तशी उत्तरे दिली आहेत. त्यांमध्ये मुख्यमंत्र्यांनी भाजपला चांगलाच इशारा दिला आहे.

मुलाखती दरम्यान उद्धवजी या सरकारला बाप किती? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की,” बाप हा एकच असतो आणि आईही एकच असते. हो तुम्हाला शरद पवारांबद्दल विचारायचे आहे का, तर शरद पवार हे सरकारचे मार्गदर्शक आहेत रिमोट कंट्रोल नाहीत”.

आम्ही तिन्ही पक्ष  वेगवेगळे आहोत. मी माझ्या पक्षाचा प्रमुख आहे. शरद पवारांचा अनुभव दांडगा आहे, त्यांच्या अनुभवाने ते मला नक्कीच मार्गदर्शन करतात. एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी मीही त्यांचे मार्गदर्शन घेतो, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

तसेच हे सरकार अकरा दिवसांत पडणार असे भाकित अनेकांनी केले होते. यासंदर्भात राऊत यांनी ठाकरेंना विचारले असता ते म्हणाले की,”उत्तर देताना तसं बोलणाऱ्यांचे दात पडत आलेत. आता हे सरकार नक्कीच पाच पर्ष पूर्ण करणार”.

महत्वाच्या बातम्या-

वेश्या व्यवसायातील महिलांसाठी महाविकास आघाडी सरकारची मोठी घोषणा

“नव्या नवरीच्या बांगड्या वाजतात, पण तीच नवरी वर्षभराने घराची मालकीण होते”

“आडवंच करायचं असेल तर बोलायचं कशाला?, जे आहे ते करुन टाकावं”

राष्ट्रवादीची ‘ही’ पदाधिकारी अडचणीत; दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे पैसे लाटल्याचा आरोप

“आम्ही इंदिरा गांधींचं ऐकलं नाही, तुम्ही कोण आहात?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या