महाराष्ट्र मुंबई

शरद पवार 25 जानेवारीला शेतकरी आंदोलनात सहभागी होणार!

मुंबई | दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी 23, 24, 25 जानेवारी रोजी आझाद मैदान येथे शेतकरी आंदोलन होत आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सहभागी होणार आहेत

आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शरद पवार हे 25 जानेवारी रोजी आझाद मैदानात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने कृषी कायद्याला विरोध केला आहे. आता या आंदोलनात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आणि त्यांचे नेते आणि मुख्यमंत्रीही सहभागी होणार आहेत, असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलंय.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांचं ऐकलं पाहिजे. सरकारने चर्चेतून तीढा सोडवला पाहिजे, असं मत शरद पवार यांनी याआधी मांडलं होतं.

थोडक्यात बातम्या-

“शेतकऱ्याच्या मुलाला संधी मिळाल्यास तोही नेतृत्व सिद्ध करतोच”

“संघ एका रात्रीत उभा राहिलेला नाही, हे विराट कोहलीच्या मेहनतीचं फळ”

“मुंबईतील नाल्यांच्या खोलीकरण आणि रुंदीकरणावर भर द्या”

‘सॉरी पप्पा, मला जगण्याचा अधिकार नाही’; फेसबुक पोस्ट करत तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

खासदारांना आता जेवणाचे पूर्ण पैसे भरावे लागणार; केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या