बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शरद पवार कोकण दौऱ्यासाठी रवाना; थोड्याच वेळात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची घेणार भेट

मुंबई |  निसर्ग चक्रीवादळाने कोकणाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं आहे. या नुकसानाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आजपासून दोन दिवस कोकण दौऱ्यावर आहेत. 9 जूनला म्हणजे आज रायगड आणि 10 जूनला ते रत्नागिरी जिल्ह्यातील भागाची पाहणी करुन शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन नुकसानीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहेत.

आज दुपारी 12 च्या सुमारास ते माणगावमध्ये पोहचणार आहे. तिथे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची ते पाहणी करणार आहेत. तसंच पडझड झालेल्या घरांची आणि उद्धस्त झालेल्या शेतीची देखील ते पाहणी करतील.

दुपारी एक वाजता ते दिवेआगार इथे पोहचणार आहेत तर दोन वाजता ते श्रीवर्धन येथे पोहचतील. दुपारी 4 वाजता स्थानिक आमदार, खासदार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समवेत त्यांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.

दरम्यान, शरद पवार यांच्या दौऱ्याकडून कोकणवासियांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खास रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी पॅकेज जाहीर केले आहे परंतू ही मदत तोकडी असल्याची टीका विरोधी पक्षाने केल्यानंतर शरद पवार आज विशेष पॅकेजची घोषणा करतात का याकडे कोकणवासियांचं लक्ष लागलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

….म्हणून मला शिवभक्तांचा सार्थ अभिमान, त्यांच्या समोर मी नतमस्तक- छत्रपती संभाजीराजे

काँग्रेसचं ठरलं… कोरोनासोबत जगायचं! कार्यालयीन कामकाज पुन्हा सुरु पण लोकांना प्रवेशासाठी ‘ही’ अट

महत्वाच्या बातम्या-

महाराष्ट्राने कोरोनाची लढाई कशी लढावी ते कर्नाटक आणि उ. प्रदेशकडून शिकावी- राजनाथ सिंह

‘एन्काऊंटर स्पेशालिस्ट’ सचिन वाझे 16 वर्षांनंतर पुन्हा पोलिसात दाखल, इथं आहे नेमणूक!

महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस चाललीये; राजनाथ सिंह महाविकास आघाडीवर बरसले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More