पवार साहेबांनी ‘या’ मतदारसंघातील उमेदवार केला जाहीर; बड्या नेत्याला देणार टक्कर

Sharad Pawar l आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर तयारी सुरु आहे. अशातच आता या निवडणुकीच्या मैदानात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार देखील उतरले आहे. कारण राज्यातील ठिकठिकाणी शरद पवार दौरा करत आहेत. अशातच शरद पवार साहेब हे सध्या चार दिवस कोल्हापुर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत.

शरद पवारांनी महायुतीच्या तीन नेत्यांची घेतली भेट :

कोल्हापूर दौऱ्यावर असतानाच शरद पवार साहेब राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबतच महाविकास आघाडीच्या नेत्यांशी संवाद साधत आहेत. तसेच आगामी निवडणुकीसंदर्भात त्यांनी स्थानिक नेत्यांना मार्गदर्शन देखील केलं आहे. अशातच त्यांनी महायुतीच्या तीन नेत्यांची भेट देखील घेतली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

कोल्हापूर दौऱ्या दरम्यान शरद पवारांनी राधानगरी तालुक्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या दोन नेत्यांनी भेट घेतली आहे. यामध्ये के. पी. पाटील, ए. वाय. पाटील या नेत्यांशी त्यांनी संवाद साधला आहे. तसेच त्यांनी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांची देखील भेट घेतली आहे. हे तिन्ही नेते राधानगरी तालुक्यातील भुदरगडमधून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.

Sharad Pawar l शरद पवारांनी कुणाची उमेदवारी जाहीर केली?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी आगामी विधानसभा निवडणुकीचा उमेदवार देखील जाहीर केला आहे. भाजपचे नेते समरजित घाटगे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. महत्वाचं म्हणजे हसन मुश्रीफ यांचं घर ज्या भागात आहे त्या गैबी चौकात सभा घेत शरद पवारांनी हसन मुश्रीफांसमोर मोठं आव्हान उभं केलं आहे.

यावेळी शरद पवारांनी लाचारी पत्करल्याची जोरदार टीका हसन मुश्रीफांवर केली आहे. तसेच समरजित घाटगे हे कागलचे पुढील आमदार असतील. इतकंच नव्हे तर महाविकास आघाडीत ते वरच्या पदावर देखील काम करतील असं शरद पवार म्हणाले आहेत. यासशिवाय शरद पवारांनी पक्षप्रवेशावेळीच समरजित घाटगेंची उमेदवारी जाहीर केली आहे.

News Title : Sharad Pawar Kolhapur Daura

महत्वाच्या बातम्या-

शनीदेव ‘या’ राशींना करणार धनवान, राहूच्या नक्षत्र परिवर्तनाने उजळणार भाग्य

येत्या 48 तासात पावसाचा जोर वाढणार, ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

“स्टेनलेस स्टील वापरलं असतं तर शिवरायांचा पुतळा पडला नसता”

ढोल-ताशा वादकांसाठी धोक्याची घंटा, तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा

लाडकी बहीण योजनेत मोठा गैरप्रकार, साताऱ्यातील घटनेनं मोठी खळबळ