बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सचिन वाझे प्रकरणावर शरद पवारांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मुंबई | राज्यात सध्या चर्चा आहे ती निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे या प्रकरणावरून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना विरोधी पक्षाने धारेवर धरलं असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या संपूर्ण प्रकणावर आपली भूमिका मांडली आहे.

राज्यातलं महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. महाविकास आघाडी सरकारमध्ये काहीही अडचण नाही. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सर्व सहकारी व्यवस्थित काम करत आहेत. काही समस्या येतात, त्या सोडवल्या जातील. सचिन वाझे प्रकरणावरून विरोधी पक्ष टार्गेट करत असताना तो मुद्दा शरद पवारांनी फेटाळून लावला. एका सब इन्स्पेक्टरचा परिणाम संपूर्ण सरकारवर होईल, असं मला वाटत नाही. या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा तपास करत असतील तर आपलं कर्तव्य आहे की त्यांना सहकार्य करणं, असं ते पत्रकार परिषदेत म्हणाले.

काल शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये तब्बल 1 तास चर्चा झाली. त्यानंतर शरद पवार थेट वाय. बी. चव्हाण सेंटरवर राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी गेल्यामुळे या मुद्द्यावरचं गूढ अधिकच वाढलं. आज दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांना या मुद्द्यावर प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे.

दरम्यान, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी योग्य पद्धतीने या प्रकरणात जबाबदारी पार पाडली आहे. जे दोषी आहेत त्यांना सगळ्यांसमोर त्यांनी आणलं, असं म्हणत त्यांनी अनिल देशमुखांचं कौतुक केलं. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणावरून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची चर्चा रंगली होती. मात्र, आता शरद पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

थोडक्यात बातम्या –

ऐन निवडणुकीच्या तोंडावर केरळमध्ये काँग्रेसला धक्का; ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादीत सामील!

सचिन वाझेंच्या अडचणीत वाढ; तीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळले!

पुण्यातील छत्रपती शिवाजी मार्केटमधील आगीत लाखोंचं नुकसान; कोंबड्या, बकऱ्या होरपळल्या!

संतापजनक! दारूच्या नशेत वडिलांनी केली जबरदस्ती; काँग्रेस पदाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल!

अंबानींच्या घरासमोर पीपीई किट घातलेली ती व्यक्ती सचिन वाझे?; ‘फॉरेन्सिक पोडियाट्री’द्वारे होणार तपास!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More