बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महाविकास आघाडीतील छोट्या पक्षांना कवडीचीही किंमत देत नाहीत, शरद पवारांनी…”

मुंबई | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहित ऊसाच्या एकरकमी एफआरपीरक्कम आणि शेतकरी मुद्यांवर भाष्य केलं आहे. महाविकास आघाडीमध्ये छोट्या पक्षांची हेळसांड होत असल्याची खंत राजू शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

2019 विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजप सरकारच्या पराभवासाठी आपण पायाला भिंगरी लावून महाराष्ट्र पालथा घातला. त्याचवेळी दिर्घकाळ तुमच्याबरोबर राहिलेले आणि तुमच्या आडून सत्तेची चव चाखलेले अनेक प्रस्थापित नेत्यांनी तुमची साथ सोडली. तुमचा पडता काळ सुरू होताच त्यातील बरेच जण तुम्हाला सोडून गेले. अशा काळामध्ये सर्वसामान्य शेतकरी तुमच्यासोबत राहिला, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

राजू शेट्टी यांनी शरद पवारांना लिहिलेल्या पत्रामध्ये ऊसाला एकरकमी एफआरपी दर, राज्य सरकारचा वाईन संदर्भातील निर्णय, अतिवृष्टी आणि महापूूर संकटामधील शेतकऱ्यांची आर्थिक मदत या मुद्यांवरून त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच राज्यात शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन तोडल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पाण्याअभावी पिके करपून जात आहेत, असं राजू शेट्टी यांनी पवारांना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटलं आहे.

साताऱ्याच्या सभेमध्ये पावसात भिजत भिजत महाराष्ट्रातील शेतकऱ्याला तुम्ही साद घातली आणि काही काळापुर्वी तुमच्यावर वृष्ट असलेला महाराष्ट्रातील शेतकरी मान्सूनच्या पहिल्या पावसाच्या सरीने रानातील ढेकूळ विरघळून जावा तसा विरघळून गेला, असंही राजू शेट्टी म्हणाले आहेत.

दरम्यान, शरद पवारांना लिहिलेल्या पत्रामध्ये राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी  सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या छोट्या पक्षांना शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते कवडीचीही किंमत देत नाहीत, अशी खंत राजू शेट्टीनी व्यक्त केली आहे. या पत्रामध्ये राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीच्या काही निर्णयाचा उल्लेख केला आहे.

पाहा पोस्ट-


थोेडक्यात बातम्या- 

फडणवीस म्हणतात, “संजय राऊतांना कोण घाबरतंय, पाचवीतील मुलंही…”

किरीट सोमय्यांचा सत्कार केलेल्या पायऱ्यांवर काॅंग्रेसनं शिपडलं गोमूत्र

“काॅंग्रेसवालो मत लो मोदीजीसे पंगा…”, रामदास आठवलेंनी सादर केली कविता

टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! ‘या’ कारणामुळे सलामीवीर KL Rahul संघाबाहेर

“कुणीतरी हिजाबच्या मागं जातंय, कुणीतरी… महत्त्वाचं काय? देश की धर्म?”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More