बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून शरद पवार बजावतील देशाचा पंतप्रधान ठरविण्यात महत्वपूर्ण भूमिका

नवी दिल्ली | लोकसभेचा निकाल फक्त पाच दिवसांवर येऊन ठेपलाय. निकालाआधीच राजधानी दिल्लीत हालचालींना वेग आलेला आहे. जर भाजपला बहुमत नाही मिळालं तर मग अशा परिस्थितीत सत्ता कोण स्थापण करणार? यावर आता चर्चा होताना दिसून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर तेलगू देसमचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे.

आम्हाला पंतप्रधानपद नाही मिळाले तरी चालेल, फक्त मोदी-शहा ही जोडी सत्तेवर बसता कामा नये, असा पवित्रा काँग्रेसने घेतला आहे. यामुळे महाआघाडीतल्या पक्षांच्या आणि नेत्यांच्या महत्वकांक्षा वाढल्या आहेत.

विरोधी पक्षांमध्ये देखील सगळं काही आलबेल आहे, असं म्हणता येणार नाही. मायावती-अखिलेश आणि ममता यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा ‘हात’ न पकडता वेगळी चूल मांडली आहे. शरद पवार हे असे नेते आहेत ज्यांच्या शब्दावर विरोधी पक्षातले नेते मागचं सगळं विसरून एकत्र येऊ शकतात.

एकूणच काय तर शरद पवार देशाचा पंतप्रधान ठरविण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतील, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

महत्वाच्या बातम्या

-नेत्यांना जबाबदारीची जाणीव राहिलेली नाही; अर्जुन कपूरची जळजळीत टीका

-…पण चोर येऊन आम्हाला पार नागडं करुन गेले; केदार शिंदेंचं मोदींवर टीकास्त्र

-मोदींना मानसिक पराभव मान्य; लोकांना उत्तर देण्याची हिंमतच उरलेली नाही- राज ठाकरे

-IPLच्या धावपळीनंतर थोडा आराम करा… कुटुंबाला वेळ द्या अन् वर्ल्डकपसाठी सज्ज व्हा- बीसीसीआय

-नायडूंनी लावलाय भेटींचा धडाका; पवारांनंतर आता या दिग्गज नेत्यांच्याही घेणार भेटी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More