बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खळबळजनक बातमी; महाविकास आघाडीतील 2 ज्येष्ठ नेत्यांची अमित शहांसोबत गोपनीय बैठक?

अहमदाबाद | गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी टाकलेला लेटरबॉम्बमुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. अशात आता भाजप-राष्ट्रवादीत अहमदाबादमध्ये गुप्त चर्चा झाल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राष्ट्रवादीचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अमित शहा यांची भेट घेतल्याचं कळतंय. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तसेच अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

शरद पवार आणि प्रफुल पटेल यांची अमित शहा यांच्यासोबत गुप्त चर्चा झाल्याची माहिती ‘दिव्य भास्कर’ या गुजराती वृत्तपत्राने दिली आहे. पटेल आणि पवार प्रायव्हेट जेटने आले होते. त्यानंतर शांतिग्राममधील गेस्टहाऊसला तिघांची भेट झाली, असा दावा या बातमीत करण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यात येत्या काळात नवीन समीकरणं तयार होणार का? महाविकास आघाडीची सत्ता जाणार का? असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहेत.

थोडक्यात बातम्या- 

‘या’ कारणामुळे पुरुषांच्या लिंगाचा आकार होतोय लहान; दिया मिर्झा म्हणाली…

“अनिल देशमुख हे अपघाताने गृहमंत्री तर उद्धव ठाकरे हे विश्वासघाताने मुख्यमंत्री झाले”

‘सामना’तून सरकारवरच टीकेचे बाण; वाचा ‘रोखठोक’मधील 10 धक्कादायक मुद्दे

‘तिने माझं आयुष्य बरबाद केलं’; दिपाली चव्हाणांनी पतीला लिहिलेल्या पत्रात उल्लेख केलेली ‘ती’ महिला कोण?

राष्ट्रवादीच्या ‘या’ दोन नेत्यांनी गृहमंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More