महाराष्ट्र मुंबई

…म्हणून शरद पवारांनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. शरद पवार अचानक राज्यपालांच्या भेटीला गेल्याने अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. मात्र ही फक्त सदिच्छा भेट असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं आहे.

बरेच दिवस झाले शरद पवार आणि राज्यपालांची भेट झाली नव्हती. राज्यपालांनी शरद पवारांना चहासाठी निमंत्रण दिलं होतं. त्यामुळे ही फक्त सदिच्छा भेट असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं आहे.

कोरोनाच्या परिस्थितीवर साधारण चर्चा झाली. पण कोणताही निष्कर्ष काढण्यासाठी ही चर्चा नव्हती. फक्त माहितीसाठी काही चर्चा झाली, असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलंय.

भाजप नेत्यांनी शरद पवारांना मध्यस्थी करण्याची विनंती केली असल्याच्या प्रश्नावर बोलताना सरकारमध्ये हस्तक्षेप करण्याची शरद पवारांची इच्छा नसते, असंही प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं आहे.

 

ट्रेडिंग बातम्या-

लग्नाचं आमिष दाखवून ठेवलेले लैंगिक संबंध बलात्कार नाही; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

सूचना केल्यावर राजकारण समजत असाल तर तुम्ही गैरसमजात रहा; फडणवीसांचं उद्धव यांना प्रत्युत्तर

महत्वाच्या बातम्या-

‘योगी आदित्यनाथ, मग तुम्हीही लक्षात ठेवा…’; राज ठाकरे यांचा थेट इशारा

दीपिका रणवीरचं लॉकडाऊन… पाहा दीपिकाचा रोमँटिक अंदाजातला व्हीडिओ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मागितली केरळ सरकारकडे ‘ही’ महत्त्वाची मदत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या