इस्लामपूर | अजून मी म्हातारा झालेलो नाही… माझी चिंता करू नका… मी नव्या उमेदीने कामाला लागलो आहे… आपल्याला विस्कटलेले संसार पुन्हा नव्याने उभे करायचे आहेत, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवर यांनी पूरग्रस्तांना विश्वास देत आधार दिला.
शरद पवार आज सांगली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पूरग्रस्त गावांना भेटी दिल्या. गावकऱ्यांच्या सध्याच्या समस्या जाणून घेतल्या आणि कुठल्याही परिस्थितीत तुम्ही घाबरू नका. मी तुमच्या पाठिशी आणि मदतीला खंबीरपणे उभा राहिल, असा शब्द पूरग्रस्तांना दिला.
2005 साली महापूर आला होता त्यावेळी केंद्रात आणि राज्यात आपले सरकार होते. आपण त्यावेळी पूरग्रस्तांना योग्य मदत केली होती. मात्र आता आपले सरकार सत्तेत नाही. पण काळजी करू नका. अजूनही राज्यात आणि केंद्रात माझं ऐकतात, असं पवार म्हणाले.
दरम्यान, शरद पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या-
-शिरूरकरांनी दिलेली मदत घेऊन खासदार अमोल कोल्हे पूरग्रस्तांच्या भेटीला
-ब्रह्मनाळमधील बोट उलटल्याची दुर्दैवी घटना; मृतांच्या संखेत वाढ…
-माजी पंतप्रधान डाॅ. मनमोहन सिंग निवडणुकीच्या रिंगणात!
-आमदार-खासदार निवडून आले की कोल्हापूरला… पूर येऊन 5 दिवस झालं तरी ठाकरे ‘मातोश्री’तच!
-साईबाबा संस्थान पूरग्रस्तांच्या मदतीला, दिला 10 कोटींचा निधी
Comments are closed.