“…तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही”, सरपंच हत्याप्रकरणावरून शरद पवारांनी सरकारला दिला इशारा

Sharad Pawar Meet Santosh Deshmukh family

Sharad Pawar l बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला हत्या झाली आई. या घटनेला अकरा दिवस उलटले असूनही अद्यापही हे प्रकरण लग्नलच तापलेलं दिसून येत आहे. अशातच आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी सरपंच संतोष देशमुख कुटुंबाची भेट घेतली आहे. यावेळी शरद पवार यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे.

…तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही :

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे राज्यच राजकारण ढवळून निघालं आहे. या घटनेनंतर आज शरद पवार यांनी संतोष देशमुख कुटुंबाची भेट घेतली आहे. यावेळी शरद पवार म्हणाले की, या धक्कादायक घटनेच्या खोलात गेले पाहिजे. तसेच या घटनेमागचा सूत्रधार नेमका कोण आहे हे देखील तात्काळ शोधून काढलं पाहिजे.

शरद पवार पुढे म्हणाले की, बीडमध्ये ही गोष्ट घडत आहे. मात्र हे काही बरोबर नाही. त्यामुळे आता देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. तसेच आपण सर्वजण या दुःखात सहभागी आहोत. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकार या घटनेच्या खोलात जात नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असे शरद पवार म्हणाले आहेत.

Sharad Pawar l मदत दिल्याने कुटुंबाचं दुःख जाणार नाही :

दरम्यान, संतोष देशमुख यांच्यासोबत जे काही घडलं ते मात्र योग्य नाही. त्यामुळे सरकारकडून देशमुख कुटुंबाला रक्कम देऊन मदत होईल. पण गेलेला माणूस तर येत नाही. तसेच मदत दिली तरी देखील कुटुंबाचं दुःख जाणार नाही. मात्र आम्ही त्यावर टीका करत नाही. परंतु, जोपर्यंत या प्रकरणाच्या खोलात जाऊन चौकशी करा. तसेच या घटनेत जो कोणी सूत्रधार आहे त्याला तातडीने धडा शिकवला पाहिजे.

याशिवाय या गावात प्रचंड दहशतीचे वातावरण आहे. त्यामुळे कृपा करा आणि या दहशतीतून बाहेर पडा. आपण सर्व मिळून याला तोंड देऊ. तसेच एकदा सामुदायिकपणे उभं राहिल्यावर कोणी आपल्याला आडवू देखील शकत नाही. त्यामुळे आता बीडमध्ये ही गोष्ट घडत आहे. पण ही गोष्ट अजिबात बरोबर नाही. त्यामुळे आता देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकार या प्रकरणाच्या खोलात जात नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा देखील शरद पवार यांनी दिला आहे.

News Title – Sharad Pawar Meet Santosh Deshmukh family

महत्त्वाच्या बातम्या-

अजितदादांच्या राष्ट्रवादीत महाभूकंप होणार? अंतर्गत हालचाली वाढल्या

“आम्हाला न्याय हवाय”; देशमुख कुटुंबियांची शरद पवारांकडे मागणी

“वाल्मिक कराड कुठं आहेत? पत्ता देतो…”; धनंजय मुंडे काय म्हणाले?

लाडक्या बहीणींची संक्रांत होणार गोड, 2100 रुपये ‘या’ दिवशी मिळणार?

मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणी महत्त्वाची व्यक्ती जेरबंद!

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .