Loading...

शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चांना एकच उधाण

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत. येत्या 20 तारखेला शरद पवार मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीच्या वृत्तामुळे राजकीय वर्तुळात चर्चाणा उधाण आलं आहे.

कोल्हापूर आणि सांगलीतील पूरस्थितीबाबत शरद पवार फडणवीसांची भेट घेणार असल्याचं कळतंय. या भेटीवेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह कोल्हापूर आणि सांगलीमधील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहे.

Loading...

पूरग्रस्तांना मदत करण्यासंदर्भात तसेच पुनर्वसन करण्यासंदर्भात काही मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात येणार असल्याचं समजतंय.

दरम्यान, पूरग्रस्तांचं पुनर्वसन कशा पद्धतीने करायचं आणि त्या करताना नेमक्या कोणकोणत्या गोष्टी अपेक्षित आहे. हे पवार मुख्यमंत्र्यांना सांगणार असल्याच्या चर्चा आहेत.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-पूरग्रस्तांची मदत करुन लांडगे परिवाराने जपला पन्नास वर्षांचा ऋणानुबंध

-“विश्वनाथ महाडेश्वर यांनी माझा हात पिरगळलाच नाही”

-ते शिवसेनेतून आले, राष्ट्रवादीकडून हरले आणि पुन्हा शिवसेनेत निघून गेले!

Loading...

-ही गुन्हे शाखा आहे की सेटलमेंट ब्रॅन्च आहे?; आर्थिक गुन्हे शाखेच्या कामगिरीवर संजय बर्वे संतापले

-मुंबईच्या पहिल्या महिला पोलिस आयुक्तपदी ‘या’ अधिकाऱ्याची नियुक्ती?

Loading...