बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट; वर्षा बंगल्यावर तासभर चर्चा

मुंबई | मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारवर मोठ्या प्रमाणात विरोधकांनी टीकेची झोड उठवली. विरोधकांच्या आक्रमक भूमिकेनंतर आता राज्य सरकार आरक्षणाचा चेंडू केंद्राकडे सोपवण्याच्या तयारीत आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारचे शिष्टमंडळ आज मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला दिल्लीला जाणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या शासकिय निवासस्थानी भेट घेतली आहे. मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या भेटीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार व उद्धव ठाकरे यांची मराठा आरक्षणापासून विविध प्रश्नांवर सुमारे एक तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

या व्यतिरिक्त ओबीसी आरक्षण, जीएसटी, राज्यातील कोरोनाची परिस्थिती व महामंडळांवरील प्रलंबित नियुक्त्यांवरही चर्चा झाली असल्याचं कळतंय. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ उपस्थित होते.

दरम्यान, 27 मे रोजी देखील उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात बैठक झाली होती. मराठा आरक्षणाच्या मुद्याबरोबरच पदोन्नतीतील आरक्षणाचा प्रश्न या बैठकीत चर्चेत होता. आता खुद्द मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या भेटीला जाणार असल्यानं शरद पवार मुख्यमंत्र्यांकडून पुर्ण तयारी करून घेताना दिसत आहेत.

थोडक्यात बातम्या-

थट्टा नशिबानं लावली! वीज पडून 350 क्विंटल कांद्याचा झाला कोळसा

रासायनिक कंपनीतल्या आगीतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत

मुंबईत दररोज हजारांच्या आत नव्या कोरोनाबाधितांची होतेय नोंद, कोरोनामुक्तीचा दर वाढला

माणुसकीला काळीमा फासणारी घटना! पैशाच्या लोभापाई सासऱ्याने सुनेला विकलं अन्…; अशा प्रकारे झाला उलगडा

अखेर बहुप्रतिक्षित आयपीएलचा मुहूर्त ठरला; ‘या’ तारखेपासून होणार उर्वरित सामने

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More