लातूर | हे सगळं पाहत असताना बाहेरून दाखवायचो नाही, पण एकटा असताना डोळ्यातून अश्रू यायचे. रात्रभर झोप येत नसे. पण जनतेचा चेहरा समोर यायचा आणि मी सर्व गोष्टी मागे टाकायचो, असं सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी किल्लारीला झालेल्या भुंकपाच्या आठवणींना उजाळा दिला.
किल्लारी आणि परिसरात झालेल्या महाभयंकर भूकंपाला 25 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी आपल्या आठवणींना वाट मोकळी करून दिली.
१९९३ला आपण आत्मविश्वासाने संकटांना तोंड दिलं त्याचं स्मरण करणारा आजचा दिवस. ३० सप्टेंबरला पहाटेच भूकंप झाला. तात्काळ निघत सकाळीच इथे हजर झालो, यंत्रणा कामाला लावली. भयंकर परिस्थिती होती. गावं उद्ध्वस्त झाली, प्रेतांचा सडा समोर होता. जखमींना सावरण्याचा प्रयत्न आम्ही करत होतो, असं त्यांनी सांगितलं.
हे सगळं पाहत असताना बाहेरून दाखवायचो नाही पण एकटा असताना डोळ्यातून अश्रू यायचे. रात्रभर झोप येत नसे. पण जनतेचा चेहरा समोर यायचा आणि मी सर्व गोष्टी मागे टाकायचो. आजही दुष्काळी परिस्थिती आहे… ठीक आहे आपण त्यावरही मात करू. pic.twitter.com/N0Y3tNhfOd
— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 30, 2018
महत्त्वाच्या बातम्या-
-समतेसाठी लढणाऱ्या शरद पवारांची साथ कधीच सोडणार नाही- छगन भुजबळ
-गोकुळच्या सभेत जोरदार गोंधळ; एकमेंकांवर चप्पलांची फेकाफेकी
-तुमच्याबद्दल मी शरद पवारांना सांगणार; डाॅ. लहानेंनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना खडसावलं!
-भाजप नेते हिंदू तरूणींवर बलात्कार करतात; अरविंद केजरीवालांचा गंभीर आरोप
-पवारांच्या मुक्कामाच्या ठिकाणात पुन्हा बदल; विश्रामगृहावरच होणार पवारांची खलबतं
Comments are closed.