…आणि शरद पवारांनी त्या आजोबांना नावानिशी ओळखलं!

पुणे | शरद पवार गावागावातील जुन्या लोकांना नावानिशी ओळखतात अशी चर्चा नेहमी ऐकायला मिळते. मात्र या चर्चेला दुजोरा देणारा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. 

एक आजोबा शरद पवारांच्या ताफ्याची वाट पाहात उभे आहेत. ताफा येतो आणि पवारांची गाडी आजोबांपाशी उभी राहते. 

आश्चर्याची गोष्ट म्हणजे या आजोबांना पाहताच पवार त्यांना चक्क नावानिशी ओळखतात. त्यानंतर त्याठिकाणी एकच हशा पिकतो. 

हा व्हीडिओ हवेली तालुक्यातील नायगाव पेठचा तर आजोबांचं नाव मुरलीधर चौधरी असल्याचं कळतंय. या व्हीडिओची सध्या सोशल मीडियात चांगलीच चर्चा आहे. 

पाहा व्हीडिओ-

महत्त्वाच्या बातम्या-

-भाजपला धक्का!!! धुळ्याचे आमदार अनिल गोटे राजीनामा देणार

-असशील तू शिवसेनेचा आमदार, माझ्याशी जोरात बोलायचं नाही!

-राजकीय आरक्षण द्यावे लागेल म्हणून धनगरांना आरक्षण दिलं नाही!

-#MeToo | एखादं नातं खराब असेल तर ते #MeToo नाही; कुक्कु नवाजुद्दीनच्या पाठीशी

-गोव्यात गोमांस बंदी करा, मनोहर पर्रिकरांच्या प्रकृतीत सुधारणा होईल!