Maharashtra l राज्यातील लोकसभा निवडणुकांचं वार नुकतंच क्षमलं आहे. या लोकसभा निवडणुकीत महायुतीला सर्वात मोठा धक्का बसला आहे. तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं आहे. अशातच आता विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीकडे अवघ्या राज्यच लक्ष असणार आहे.
जयंत पाटलांनी केलं मोठं विधान :
येत्या काही दिवसांत सर्वच पक्षांनी आपापल्यापरीने विधानसभेची तयारी जोरात सुरू केली आहे. यासाठी उमेदवारांची चाचपणी व जागावाटप यासाठी देखील खलबतं सुरू झाली आहेत. लोकसभा निवडणुकी प्रमाणेच राज्यातील आगामी काळातील विधानसभा निवडणूकही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.
येत्या काळात शरद पवार आगामी विधानसभेसाठी किती जागांवर आपले शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अशातच शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यासंदर्भात मोठी विधान केलं आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्ष जास्त प्रमाणात विधानसभेच्या जागा लढवणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले आहेत. महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळालं आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी देखील कंबर कसली आहे.
Maharashtra l शरद पवार गटाचं विधानसभा निवडणुकीकडे लक्ष केंद्रित :
एकीकडे शिवसेना बाळासाहेब ठरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरेंनी स्वबळावर विधानसभा लढवण्याची तयारी असल्याचं म्हटलं आहे. तर, दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील इतर पक्षांपेक्षा जास्त जागा मिळवल्याने विधानसभेत देखील सर्वाधिक जागांसाठी काँग्रेस पक्ष आग्रही असल्याची माहिती मिळत आहे. तसेच शरद पवारांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठ्या प्रमाणात विधानसभेच्या जागा लढवणार असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले की, “आता साडेतीन-चार महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्ष हे सर्वच जागांवर निवडणूक लढवणार आहेत. कारण आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्या सरावानं मतदारसंघात जास्त फिरता येईल, असं वाटत नाही. त्यामुळे काय करायचंय ते तुम्हीच सर्वानी मिळून करायचं आहे. कारण लोकसभेत मी दहा मतदारसंघ फिरलो आहे, त्यावेळी माझ्या लक्षात आलं की, फार प्रचंड काम केल्याशिवाय गडी दुरुस्त होत नसल्याचं त्यांनी बोललं आहे.
News Title- Sharad Pawar NCP will contest in how many assembly seats?
महत्त्वाच्या बातम्या-
अजित पवार ‘या’ घोटाळा प्रकरणी पुन्हा अडचणीत सापडणार?
शेतकऱ्यांनो यापुढे कांद्याचे दर वाणिज्य मंत्रालय ठरविणार, शेतकऱ्यांचा फायदा की तोटा?
राज्यातील पावसासंदर्भात हवामान विभागाने वर्तवला महत्वाचा अंदाज!
ज्योती मेटेंची विधानसभा निवडणुकीबाबत मोठी घोषणा!
पुढील दोन दिवसात या राशीचे नशीब चमकणार; होणार फायदाच फायदा