Top News महाराष्ट्र मुंबई

…म्हणून मी 2014 ला भाजपला पाठिंबा देतो असं म्हटलं, ते ‘टॉप सिक्रेट’ पवारांनी अखेर सांगितलं !

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या चाणक्यनितीची आणि राजकीय डावपेचांची चर्चा संपूर्ण देशात होत असते. असाच एक डावपेच त्यांनी 2014 च्या निवडणूक निकालानंतर आखला होता. तोच डावपेच शरद पवार यांनी राऊतांना दिलेल्या मुलाखतीत समजावून सांगितला.

शरद पवार यांनी 2014 च्या निवडणूक निकालानंतर भाजपला बिनविरोध पाठिंबा देतो असं म्हटलं होतं. त्यामुळे देशाच्या राजकारणात एकच खळबळ माजली होती. मात्र मी असं का केलं म्हटलं? याचं स्पष्टीकरण देताना पवार म्हणाले, “माझी पहिल्यापासून इच्छा होती की शिवसेनेने भाजपबरोबर जाऊ नये. शिवसेना भाजपबरोबर जातीये असं ज्यावेळी मला दिसलं त्यावेळी मी जाणीवपूर्वक तसं स्टेटमेंट दिलं”, असं टॉप सिक्रेट पवारांनी यावेळी संबंध महाराष्ट्राला सांगितलं.

“भाजपला पाठिंबा देतो हे म्हणण्यापाठीमागचा एवढाच उद्देश होता की शिवसेना भाजपपासून दूर व्हावी. परंतू त्यावेळी तसं घडलं नाही. त्यांन मग एकत्र येऊन सरकार बनवलं आणि चालवलं ती गोष्ट वेगळी”, असंही पवार म्हणाले.

“भाजपच्या हाताने सरकार चालवू देणं हे शिवसेनेच्या हिताचे नाही. कारण दिल्लीची सत्ता त्यांच्या हातात होती. परत राज्याची सत्ता म्हणजे मुख्यमंत्री त्यांच्या हातात. यामुळे शिवसेना किंवा अन्य पक्षांना लोकशाहीमध्ये त्यांच्या पक्षांच काम करण्याचा अधिकार आहे हेच त्यांना मुळात मान्य नाही. आणि त्यामुळेच आज ना उद्या या सर्वांना निश्चितपणे धोका देणार आहेत म्हणून आमची ती एक राजकीय चाल होती”, असं पवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

शरद पवारांच्या ‘या’ दाव्याने राजकारणात खळबळ, भाजपला हादरा!

….तर महाराष्ट्रात कोणतंही ऑपरेशन फोल ठरेल, शरद पवारांचं भाजपला ओपन चॅलेंज

महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस होईल का?, शरद पवारांचं ‘पॉवरफुल्ल’ उत्तर!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या