शिवसेनेसोबत नव्हे, काँग्रेससोबतच लोकसभा लढणार!

मुंबई | 2019 ची निवडणूक काँग्रेससोबत लढण्याची घोषणा शरद पवार यांनी केलीय. शिवसेनेची हातमिळवणी करण्याचा कोणताही विचार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. मुंबई मिररला त्यांनी यासंदर्भात मुलाखत दिलीय. 

लोकसभा निवडणुकीत आघाडी करण्यासंदर्भात राहुल गांधी यांच्यासोबत दोनदा चर्चा झाली आहे. नुकताच आम्ही विदर्भात एक संयुक्त कार्यक्रमही घेतला. एकत्र लढलो तर आम्ही निश्चितच पर्याय निर्माण करु, असं त्यांनी म्हटलंय. 

दरम्यान, शिवसेना वेगळी झाली ते चांगलंच झालं. सत्तेत राहूनही त्यांना सन्मान नव्हता. आता त्यांनी एकटं लढावं. स्वबळावर लढण्याच्या निर्णयामुळे त्यांना ताकद मिळेल, असंही पवार म्हणाले.