पवार म्हणतात… जर असं केलं तर अलमट्टीवर कायमस्वरूपी तोडगा निघेल!

पवार म्हणतात… जर असं केलं तर अलमट्टीवर कायमस्वरूपी तोडगा निघेल!

कोल्हापूर | अलमट्टीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवायचा असेल तर केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारला घेऊन बसायला हवं. कर्नाटकला स्वच्छ निर्देश देऊन पुन्हा अशी परिस्थिती उद्भवणार नाही याची काळजी घ्या, असं बजावायला हवं, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.

अलमट्टी धरणातून पुरेसा पाण्याचा विसर्ग केला गेला नाही. त्यामुळे सांगली- कोल्हापूरात पूर स्थिती निर्माण झाली. त्यावर शरद पवारांनी आपलं मत व्यक्त केलं. पवार जैनापूर इथं पूरग्रस्तांची विचापूस करण्यासाठी गेले होते. तेव्हा ते बोलत होते.

लोकांवर पथसंस्था, सोसायट्या, बँकांचं जे कर्ज आहे ते केंद्र आणि सरकारने पूर्णपणे माफ करायला हवं, असंही पवार म्हणाले.

किल्लारी भूकंपावेळी 1 लाख नवी घरं बांधली ती आतापर्यंत टिकली आहेत. आताही तशीच घरं बांधायला हवीत, त्यासाठी केंद्र सरकारची मदत घ्यायला हवी, असंही पवार यावेळी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-कलम 370 रद्द करण्याला जे विरोध करतात त्यांची यादी बनवा अन्…- नरेंद्र मोदी

-पूरग्रस्त लोकांचं दु:ख पाहून शर्मिला ठाकरेंना रडू कोसळलं…!

-पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी वेळेप्रसंगी कर्ज काढू पण त्यांचं पुनर्वसन करू- चंद्रकांत पाटील

-सरकारनं पूरग्रस्तांसाठी मोठ्या निधीची घोषणा केली त्याचं कौतुकच पण..- संभाजीराजे भोसले

‘आपला माणूस’ नाना पाटेकर पूरग्रस्तांच्या मदतीला; 500 घरं बांधून देणार

Google+ Linkedin