Top News महाराष्ट्र मुंबई

सरकारस्थापनेबाबत भाजपशी चर्चा झाली होती का?, शरद पवारांचा गौप्यस्फोट म्हणाले…

मुंबई |  माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी ‘द एनसायडर’ला सविस्तर मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी सरकार स्थापनेबाबत आमची राष्ट्रावादीच्या नेतृत्वाशी चर्चा झाली होती, असा गौप्यस्फोट करून खळबळ उडवून दिली होती. याच गौप्यस्फोटवर संजय राऊत यांनी पवारांना विचारलं असता, शरद पवार यांनी फडणवीसांची खिल्ली उडवत त्यांच्यावर निशाणा साधला.

सरकार स्थापनेबाबत भाजपशी आमची कधीच चर्चा झाली नाही, असं सांगत फडणवीसांचा दावा पवारांनी खोडून काढला. तसंच देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय स्तरावरील निर्णयप्रक्रियेत कधीच नव्हते. त्यांना काही माहिती नाही, असा निशाणाही त्यांनी फडणवीसांवर साधला.

फडणवीस द इनयाडरशी बोलताना म्हणाले होते की, “आम्ही आणि राष्ट्रवादी मिळून महाराष्ट्रात एकत्र सरकार स्थापन करणार होतो. त्यांच्याशी आमची वरिष्ठ पातळीवर चर्चा देखील झाली होती परंतू नंतर राष्ट्रवादीच्या पक्षनेतृत्वाने पलटी मारली”. फडणवीसांच्या या दाव्यानंतर पवार काय खुलासा करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. मात्र फडणवीसांच्या वक्तव्याचा इन्कार करत आमच्यात अशी कुठलीच चर्चा झाली नसल्याचं पवारांनी म्हटलं आहे.

दुसरीकडे राऊतांना दिलेल्या मुलाखतीत पवारांनी फडणवीसांनर बोलताना तुफान टोलेबाजी केली. मी पुन्हा येईन या फडणवीसांच्या वक्तव्याची खिल्ली उडवत लोकांना गर्व आवडत नाही. फडणवीसांचं ते वाक्य लोकांना खटकल्याचा उल्लेख देखील पवारांनी यावेळी केला.

शरद पवार मुलाखत स्पेशल बातम्या-

तुम्ही या सरकारचे हेडमास्तर आहात की रिमोट कंट्रोल?; शरद पवारांचं आश्चर्यकारक उत्तर

तेव्हा मात्र मला मोठा धक्काच बसला अन् समजलं की…..- शरद पवार

उद्धव ठाकरे देखील ‘त्याच’ वाटेने पुढे चालले आहेत- शरद पवार

साताऱ्याची ती पावसातली सभा आता परत होईल?, शरद पवारांचं खास अंदाजात उत्तर

2014 च्या भाजप-शिवसेना सरकारवर शरद पवारांचं खळबळजनक भाष्य, म्हणाले…

राम मंदिर आंदोलनाशी तुमचा संबंध आला नाही, राऊतांच्या कळीच्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले…

आज माणूस माणसाला घाबरतोय असं चित्र आहे मग तुम्ही…., राऊतांच्या प्रश्नावर पवार म्हणाले

…तर भाजपच्या 40-50 जागाच निवडून आल्या असत्या; शरद पवारांनी सांगितलं ‘हे’ कारण

ठाकरे सरकार आणि राष्ट्रवादीत मतभेद आहेत काय?, शरद पवारांचं धडाकेबाज उत्तर

‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना शरद पवारांनी दिला ‘हा’ सल्ला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या