Top News देश राजकारण

मोदींच्या सत्तेला सुरूंग लावण्याचा प्लॅन ठरलाय, त्यासाठी मी पुढाकार घेणार; पवारांचा मोठा गौप्यस्फोट!

मुंबई |  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दै. सामनाला दीर्घ मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी 2014 तसंच 2019 ची निवडणूक, सध्याचं ठाकरे सरकार, कोरोना आणि त्यामुळे उद्भवलेली परिस्थिती, देशासह आंतराराष्ट्रीय घडामोडी आणि महाराष्ट्रातला तसंच देशातला विरोधी पक्ष यांसह आदी विषयांवर आपली रोखठोक मतं मांडली. यामध्ये मोदींची सत्ता उलथवून लावण्यासाठी कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर मी सगळ्यांशी बोलणार आहे, असा स्फोट शरद पवार यांनी केला.

देशातील विरोधी पक्षाला जाग आलीये असं दिसत नाही. तसंच विरोधी पक्ष विखुरलेला आहे. भविष्यामध्ये विरोधी पक्ष देशासमोर चांगलं काम करेल का? आपण त्यासाठी काही पुढाकार घेणार आहात का? असा प्रश्न राऊत यांनी पवारांना विचारला. त्यावर बोलताना पवार यांनी आपला भाजपचं सरकार घालवण्याचा इरादा व्यक्त केला तसंच या कामी मी स्वत: पुढाकार घेणार असल्याचं सांगितलं.

पवार म्हणाले, “कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आणि संसद एकदा का सुरू झाली की या कामाला गती येईल. देशांतल्या विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांमध्ये अशी एक भावना आहे की आपण एकत्र बसलं पाहिजे. आपण एकत्र बसून एक कार्यक्रम ठरवून देशवासियांसमोर एक पर्याय दिला पाहिजे. तो पर्याय देण्याची कुवत आजच्या विरोधी पक्षाच्या नेत्यामध्ये आणि त्यांच्या ऐक्यामध्ये निश्चितपणे आहे.”

“सगळे पक्ष कोरोनाकडे डायव्हर्ट झाल्याने ते काम आज थांबलं आहे. कोरोनाचे संकट येण्यापूर्वी देशांमधील विरोधी पक्षांचे लोक दोनदा एकत्र बसले. चर्चा केल्या. काही गोष्टींची धोरणे ठरवण्याच्या दृष्टीने विचार केला. आणि हे सगळं चित्र बदललं या रोगामुळे… पण माझी खात्री आहे की एकदा का संसद सुरू झाली की सगळ्या विरोधी पक्षांना एकत्र करणं याबद्दलची भूमिका घ्यावी लागेल”

“माझीसारखी व्यक्ती त्यात नक्कीच लक्ष देईल… याबाबत कुणाला भेटायला मला कमीपणा वाटणार नाही. सगळ्यांना भेटून आपण जर एकाविचाराने जर देशाला पर्याय देऊ शकलो तर ती आज राष्ट्राची गरज आहे. ती राष्ट्रीय गरज पूर्ण करण्यासाठी मी आणखी कशाचीही अपेक्षा न करता मी आणखीन अनेक पक्षांचे सहकारी याबाबतीत या विषयांवर विचार करत आहोत. आणि त्याची अंमलबजावणी सुरू करू”

शरद पवार स्पेशल मुलाखत बातम्या-

“शिवसेना-भाजपमध्ये अंतर वाढावं म्हणून जाणीवपूर्वक मी ‘ते’ काम केलं”

शरद पवारांच्या ‘या’ दाव्याने राजकारणात खळबळ, भाजपला हादरा!

…म्हणून मी 2014 ला भाजपला पाठिंबा देतो असं म्हटलं, ते ‘टॉप सिक्रेट’ पवारांनी अखेर सांगितलं !

….तर महाराष्ट्रात कोणतंही ऑपरेशन फोल ठरेल, शरद पवारांचं भाजपला ओपन चॅलेंज

महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस होईल का?, शरद पवारांचं ‘पॉवरफुल्ल’ उत्तर!

प्रियांका गांधींचं घर काढून घेणं हा सत्तेचा दर्प आणि क्षुद्रपणा, शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या