सरकारला राहुल गांधींची धास्ती वाटायला लागलीयं- शरद पवार

चंद्रपूर | भाजप सरकारला राहुल गांधींची भीती वाटते म्हणून बोफर्स प्रकरण उकरून काढलं जातंय, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंय. चंद्रपूरमध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

राहुल गांधींची सरकारला धास्ती वाटायला लागलीय. त्यामुळे सीबीआयद्वारे बोफर्सचा मोठा ठपका ठेवण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न सुरूयेत. त्यासाठी भाजप सरकार सत्तेचा गैरवापर करतंय, असा आरोपही त्यांनी केला.

गांधी कुटुंबाचं योगदान लक्षात न ठेवता तुम्ही जुनं रेकॉर्ड काढून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करताय, असंही ते म्हणाले.