… हा उद्योग चंद्रकांत पाटलांनी कधी सुरू केला- शरद पवार

सातारा | चंद्रकांतदादा पाटील यांनी खिंडार पाडण्याचा नवा उद्योग कधी सुरू केला, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी लगावला आहे. ते साताऱ्यात पत्रकारांशी बोलत होते.

सातारा दौऱ्यावर असताना महसुलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्हात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्वतंत्र निवडणूक लढवून दाखवावी, तसंच अगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला खिंडार पाडणार असंही ते म्हणाले होते. त्याला पवारांनी प्रत्युत्तर दिलं.

दरम्यान, चंद्रकांत पाटील हे ज्या पक्षाचे आहेत; त्या पक्षाने गेल्या ३० वर्षात स्वबळावर निवडणूक लढवली नाही. शिवसेना, रिपाईं यांना एकत्र घेवून नियोजन केले आहे. हे असे झालं ‘आपलं ठेवायंच झाकून अन दुसर्‍याचं बघायचं वाकून’ हे काय शहाणपणाचं लक्षण नाही, असंही पवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-आपलं ठेवायंच झाकून अन् दुसर्‍याचं बघायचं वाकून; शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

-गोव्यात सत्ता बदलासाठी राष्ट्रवादीच्या एकमेव आमदाराचा आटापिटा

-शरद पवारांनी सांगीतल्यास श्रीनिवास पाटील उदयनराजेंच्या विरोधात लढणार!

-डीजेला परवानगी न दिल्यास मुर्ती विसर्जन करणार नाही; गणेश मंडळांचा निर्णय

-भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; महिला सभापतीलाच धमकावलं

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या