…म्हणून भुजबळांना मुख्यमंत्री केलं नाही; शरद पवारांनी सांगितलं कारण

Sharad Pawar

Sharad Pawar l ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा गौप्य्स्फोट केला आहे. सध्या शरद पवार हे राज्यात विविध ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेत आहेत. मात्र यावेळी शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदासंदर्भात एक गौप्य्स्फोट केला आहे. त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.

शरद पवारांनी केला मोठा गौप्यस्फोट :

महाविकास आघाडीमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत असणाऱ्या शरद पवार यांनी छगन भुजबळांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. यावेळी शरद पवार म्हणाले की, 2004 साली छगन भुजबळांना मुख्यमंत्री केलं नाही, परंतु असं नेमकं का करण्यात आलं यामागचं कारण त्यांनी स्पष्ट केलं आहे.

शरद पवार म्हणाले की, 2004 च्या विधानसभेच्या निवडणुकीत (तत्कालीन) राष्ट्रवादी कॉंग्रेसला सर्वाधिक जागा मिळून देखील मी मुख्यमंत्रिपद कॉंग्रेस पक्षाला दिलं. मात्र त्यावेळी ‘सिनिअर’ म्हणून छगन भुजबळांचं नाव माझ्यापुढे होतं. परंतु छगन भुजबळांचं नंतरचं राजकारण तुम्ही बघा.त्यानंतर त्यांना तुरूंगात देखील जावं लागलं आहे. मात्र त्या काळात छगन भुजबळांच्या हातात नेतृत्व दिलं असतं, तर महाराष्ट्राची अवस्था ही अत्यंत चिंताजनक झाली असती असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला आहे.

Sharad Pawar l अजित पवारांच्या मनात कायम खदखद :

याशिवाय 2004 मध्ये मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे न गेल्याची खदखद उपमुख्यमंत्री अजित पवार हे सातत्याने बोलून दाखवतात. तसेच शरद पवार यांनी काही गोष्टी स्पष्टच करत आपण मंत्रीपदं जास्त घेतल्याचं त्यांनी त्यावेळी सांगितलं होत.

कारण जयंत पाटील, आर. आर. पाटील, अजित पवार हे तरूण पुन्हा कॅबिनेट मंत्री झाले असं सांगताना नव्या नेतृत्वाला बळ देण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा असल्याचा मुद्दा शरद पवार यांनी अधोरेखित केला होता.

News Title – Sharad pawar on chhagan bhujbal

महत्त्वाच्या बातम्या-

हिंदूंच्या संख्येत तब्बल ‘इतक्या’ टक्क्यांची घट; कोणाचा वाढला आकडा?

“शिंदेंच्या सर्व उमेदवारांना 25 कोटी…”; संजय राऊतांचा गंभीर आरोप

अजितदादांची चिंता वाढली, भाजपच्या बड्या नेत्याचा घड्याळाविरोधात प्रचाराचा इशारा

गुड न्यूज! सोने-चांदीत मोठी घसरण, जाणून घ्या आजच्या किंमती

“आम्ही गांXची अवलाद नाही, कार्यकर्त्याला हात लावला तर..”; ‘या’ नेत्याचा गुलाबराव पाटलांना इशारा

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .