‘धडा शिकवण्याची वेळ आलीये’; शरद पवारांनी केलं ‘या’ नेत्याला पाडण्याचं आवाहन

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sharad pawar | यंदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकारणात अनेक गणितं बदललेली पाहायला मिळत आहेत. पक्ष संस्थापकांना डावलून पक्षातील नेत्यांनी पक्षावर दावा केला. ज्यांनी मोठं केलं त्यांना नेत्यांनी खोटं ठरवत पक्षावर दावा केला. निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह हे पक्ष संस्थापकांचं नसल्याचं सांगितलं आहे. यावरून आता राज्यातील राजकारणावर शरद पवार यांनी अजित पवार गटात गेलेल्यांवर सडकून टीका केली आहे.

शरद पवार (Sharad pawar) यांचे मानसपुत्र सध्या अजित पवार गटामध्ये गेले आहेत, त्यांना पाडण्याचं आवाहन शरद पवार यांनी मतदारांना केलं आहे. शरद पवार (Sharad pawar) यांचे मानसपुत्र हे दिलीप वळसे पाटील आहेत. आंबेगाव हे दिलीप वळसे पाटील यांचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात जाऊन शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांच्यात निष्ठा नसल्याचं वक्तव्य करत केलं आहे.

आंबेगाव मतदारसंघातून अनेक नेत्यांनी माझ्यासोबत काम केलं आहे. ते काहीजण सध्या हयातीत नसल्याचं शरद पवार (Sharad pawar) म्हणाले आहेत. ते या मतदारसंघातून निवडणूक लढवताना कोणाचा फोटो लावला हे सर्वांना माहिती असेल, तोवर लगेच कुठून तरी तुरूंगात टाकण्याची धमकी आली. त्या भीतीपोटी ते दूसरीकडे गेले आहेत. तुमच्या भागातील अनेकांनी माझ्यासोबत काम केलं आहे. त्यांच्याकडे निष्ठा होती आणि आज ते नाहीयेत, असं शरद पवार म्हणाले आहेत.

“धडा शिकवायला लागणार”

“आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांना काय द्यायचं राहिलं होतं? त्यांना काय कमी पडू दिलं होतं? मंत्रीपद दिलं, विधानसभेचं अध्यक्षपद दिलं आहे, साखर उद्योगाचं राष्ट्रीय पातळीवरील अध्यक्षपद दिलं. विविध संस्थानांवर काम करण्याची संधी दिली. एवढं सर्व देऊनही त्यांच्यामध्ये निष्ठा राहिली नाही ते निघून गेले. नागरिकांशी ते निष्ठा पाळणार नाहीत, म्हणून आता त्यांना धडा शिकवायला लागणार आहे”, असं शरद पवार मतदारांना म्हणाले.

“भ्रष्टाचाराचा नारा, तुरूंगापेक्षा भाजप बरा”

गेल्या काही दिवसांआधी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण देखील भाजपमध्ये गेले. यावरून शरद पवार यांनी भाजपला खडेबोल सुनावलं आहे. फोडाफोडी सुरू आहे. पक्ष फोडले जातात, नेते फोडले जात आहेत, माणसं फोडली जात आहेत, जायचं तर तुरूंगात जा नाहीतर आमच्याकडे या अशी भूमिका अनेक राज्यातील नेते स्विकारत आहेत. भ्रष्टाचाराचा नारा, तुरूंगापेक्षा भाजप बरा अशी स्थिती राज्यकर्त्यांनी केली आहे, असं ते म्हणालेत.

“अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री पद दिलं तरीही ते विसरले”

शरद पवार यांनी अशोक चव्हाण यांच्या भाजप पक्षप्रवेशावर भाष्य केलं आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांआधी अशोक चव्हाण यांच्याबाबत वक्तव्य केलं होतं. त्यावेळी त्यांनी लगेचच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षाने त्यांना मुख्यमंत्री पद दिलं तरीही ते विसरले,” असं शरद पवार म्हणाले.

News Title – Sharad pawar on dilip walse patil

महत्त्वाच्या बातम्या

बारामतीच्या राजकारणात आणखी एक पवार, अजित पवारांचं टेंशन वाढणार?

मॉडेलच्या आत्महत्या प्रकरणी ‘हा’ स्टार खेळाडू अडचणीत; ‘तो’ शेवटचा फोन कॉल…

‘आरक्षणाची लढाई सोडून द्या, कारण…’; गुणरत्न सदावर्तेंचा मराठा तरुणांना सल्ला

गोल्डनमॅन पंढरीशेठ फडके यांच्या मृत्यूचं कारण आलं समोर!

‘या’ SIP मुळे तुम्हीही व्हाल मालामाल, जाणून घ्या अधिक