बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लॉकडाऊनच्या काळात डॉ.आंबेडकर जयंतीबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याबाबत काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा सोहळा आपण जवळपास महिना ते दीड महिना साजरा करत असतो. मात्र आता यावेळेला हा सोहळा साजरा करण्याचा प्रसंग आहे का? याचा गांभिर्याने विचार करायची गरज आहे, असं पवार यांनी म्हटलं आहे.

आपण अनेकदा आंबेडकर जयंतीसारखा सोहळा हा तीन ते चार आठवडे साजरा करत असतो. यावेळेला थोडंस या कार्यक्रमाला पुढे नेणं शक्य आहे का? याचा विचार निश्चितपणे करायची वेळ आली असल्याचं पवारांनी म्हटलं आहे.

आपण सामूहिकपणे एकत्र आलो तर त्यामुळे नवीन समस्यांना तोंड देण्याचा प्रसंग उद्भवू शकतो. याचा परिणाम समाजाच्या सर्व घटकांवर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाबासाहेबांचे स्मरण करुया. त्यांचे योगदानाचे आठवण करु, असा सल्ला शरद पवार यांनी दिला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

कोरोनाने घेतला पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेल्या व्यक्तिचा बळी

जमत नसेल तर घरी जा, हॉस्पिटलला उकिरड्याची अवकळा पाहून तुकाराम मुंढेंचा संताप

महत्वाच्या बातम्या-

जमत नसेल तर घरी जा, हॉस्पिटलला उकिरड्याची अवकळा पाहून तुकाराम मुंढेंचा संताप

तबलिगी जमातीचे लोक डाॅक्टरांवरच थुंकले; शिवीगाळ केल्याचाही आरोपअशा लोकांची आता खैर नाही; अजित पवारांचा इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More