मुख्यमंत्र्यांचं ‘हे’ विधान म्हणजे या वर्षातला सर्वात मोठा विनोद!

सातारा | यशवंतराव चव्हाण साहेबांना अभिप्रेत असलेल्या महाराष्ट्रासाठी हे सरकार काम करत आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हणणं म्हणजे या वर्षातील सर्वात मोठा विनोद आहे, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला.

यशवंतराव चव्हाणांच्या 33व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यशवंतराव चव्हाण यांच्या स्वप्नातील महाराष्ट्राकडे राज्याची वाटचाल सुरूये, असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं. त्यावर शरद पवारांनी बोचरी टीका केली.

मुख्यमंत्र्यांनी यशवंतराव चव्हाणांना आदरांजली वाहिली. त्यानंतर काही वेळानं शरद पवार प्रीतीसंगमावर पोहोचले.