कोल्हापूर | देशात केवळ हिंदुत्ववादाचा विचार चालवणे हे घातक आहे. सर्व धर्मिय नागरिकांचा सन्मान करणं गरजेचं आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी ते बोलत होते.
राजर्षी शाहू महाराजांच्या नगरीतून वेगळ्या विचाराच्या शक्ती मोठ्या होतात याचा धक्का बसतो, अशी खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली. तसेच शरद पवार यांनी अप्रत्यक्षरित्या धनंजय महाडिक यांच्यावर देखील निशाणा साधला.
जे होतंय ते कोल्हापुरातील विचारांशी सुसंगत नाही, त्यामध्ये आता बदल करायचा आहे. महाआघाडीतला प्रत्येक उमेदवार आपला समजा. त्याचा प्रचार करा. येथे पुरोगामी विचारांशी तडजोड होत नाही हे दाखवून द्या, असं आवाहन पवार यांनी उपस्थितांना केलं.
दरम्यान, महाराष्ट्रात मी जिथे जिथे जातोय तिथे तिथे मला सत्तापरिवर्तनाची लाट दिसतीये, असं पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
कोण नितीन नांदगावकर???; मनसेची बोचरी टीका https://t.co/EUrgVwgRD4 @mnsadhikrut
— थोडक्यात (@thodkyaat) October 5, 2019
गडकरींसंदर्भात आशिष देशमुखांनी केलेल्या वक्तव्यामुळे एकच खळबळ https://t.co/fZTXlNlP2f @BJP4Maharashtra
— थोडक्यात (@thodkyaat) October 5, 2019
“माझ्यातली पंकजा मुंडे केव्हाच संपलीये… मी आता गोपीनाथ मुंडे धारण केलाय” – https://t.co/H90p6yVNQ8 @Pankajamunde @dhananjay_munde @NCPspeaks
— थोडक्यात (@thodkyaat) October 5, 2019
Comments are closed.