बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘निसर्ग’मुळे कंबर मोडलेल्या कोकणवासियांना शरद पवारांनी असा दिला धीर

रायगड | निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची कोकणातील काही भागात जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी कोकणवासियांना धीर देखील दिला.

हिंमत दाखवली, योग्य नियोजन केलं आणि मदत मिळाली तर आपण पुन्हा उभं राहू शकतो, असं शरद पवार म्हणाले. तसंच नुकसानग्रस्तांना उद्यापासून रॉकेल, तांदूळ आणि गव्हाचं वाटप करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

शरद पवार यांनी आज म्हसळा, माणगाव, दिवे आगर आणि श्रीवर्धन येथे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. स्थानिकांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरेही उपस्थित होत्या.

दरम्यान, शरद पवार यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या सूचना देखील केल्या. त्यांनी प्रसारमाध्यमांशी देखील संवाद साधला. उद्या आणखी एक दिवस ते नुकसानीची पाहणी करणार आहेत.

 

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

‘एन्काऊंटर स्पेशालिस्ट’ सचिन वाझे 16 वर्षांनंतर पुन्हा पोलिसात दाखल, इथं आहे नेमणूक!

….म्हणून मला शिवभक्तांचा सार्थ अभिमान, त्यांच्या समोर मी नतमस्तक- छत्रपती संभाजीराजे

महत्वाच्या बातम्या-

रिंगमास्टरच्या हंटरवर चालणाऱ्या सरकारचे मंत्री…; राष्ट्रवादीचं राजनाथ सिहांना सणसणीत प्रत्युत्तर

शरद पवार कोकण दौऱ्यासाठी रवाना; थोड्याच वेळात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची घेणार भेट

महाराष्ट्राने कोरोनाची लढाई कशी लढावी ते कर्नाटक आणि उ. प्रदेशकडून शिकावी- राजनाथ सिंह

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More