बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘सीमावादावर ‘हे’ शेवटचं हत्यार’; शरद पवारांची रोखठोक भूमिका

मुंबई | आमच्या सगळ्यांच्या यातना एक-दोन दिवसांचा असतील पण सीमा भागातला तरुण हा पिढ्यांपिढ्या या सगळ्या यातना सहन करतोय. आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट आपलं शेवटचं हत्यार असल्याचं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं आहे.

मुंबईमध्ये ‘महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद: संघर्ष आणि संकल्प’ या पुस्तकाचं प्रकाशन झालं. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. या कार्यक्रमात पवार बोलत होते.

कोर्टात आपल्याला पूर्ण तयारीने भूमिका मांडावी लागेल. यासाठी निष्णात वकील देखील देण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी दाखवली आहे. सीमावादाचा प्रश्न अजूनही तसाच आहे. पण आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासाठी अधिक लक्ष घालत आहेत ही जमेची बाजू आहे. या प्रश्नासाठी महाराष्ट्र एकीनं उभा आहे, असं शरद पवार म्हणाले

दरम्यान, गेले अनेक वर्ष ज्या प्रश्नासाठी मराठी माणूस अस्वस्थ आहे, त्या प्रश्नाची ऐतिहासिक पार्श्वभूमी पुस्तक रुपाने कायमस्वरुपी समाजासमोर कायमस्वरुपी राहावी यासाठी राज्य सरकारनं पुढाकार घेतला. या पुस्तकाची एक इंग्रजी आवृत्ती देखील यायला हवी, असंही शरद पवार म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

“रोज वचवच करणारे संजय राऊत कालच्या घटनेवर काही बोलले नाहीत”

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात केलं दाखल!

“दिल्लीतील हिंसा हा शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा भाजपचा कट”

दिल्लीत हिंसाचार करणारे शेतकरी नाहीत, ते तर देशद्रोही- सदाभाऊ खोत

“शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत केंद्र सरकार उदासीन असून ते शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More