Top News महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस होईल का?, शरद पवारांचं ‘पॉवरफुल्ल’ उत्तर!

मुंबई |  विविध राज्यात ऑपरेशन लोटसचे धक्के बसत असताना महाराष्ट्रात देखील ऑक्टोबर महिन्यात ऑपरेशन लोटस होईल, असा कयास भाजप नेते लावत असल्याचं संजय राऊत मुलाखतीत म्हणाले. त्यावर बोलताना पवारांनी खास पॉवरफुल्ल अंदाजात महाराष्ट्रात कोणतंच ऑपरेशन यशस्वी होणार नाही असं ठणाकावून सांगत ठाकरे सरकारला पाच वर्ष कसलीही भिती नसल्याचा विश्वास व्यक्त केला.

भाजपच्या ऑपरेशन लोटसला प्रत्युत्तर देताना पवार म्हणाले की, “पहिल्यांदा तीन महिन्यांत ठाकरे सरकार पडणार असं सांगत होते… नंतर आता सहा महिने झाले… नंतर सप्टेंबरचा वायदा आहे… काही लोक ऑक्टोबरचा करतायेत… माझी खात्री आहे की पाच वर्ष उत्तम रितीने राज्याचा कारभार करेल आमि ऑपरेशन कमळ असो वा आणखी काही, महाराष्ट्रावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही

विविध राज्यातली विरोधी पक्षाची सरकरं पाडण्याच केंद्रिय नेतृत्वाने चंग बांधला आहे. तशी महाराष्ट्रात देखीस चर्चा सुरू असल्याचं राऊत यांनी म्हटलं. त्यावर बोलताना माझ्याही कानावर अनेकदा अश्या चर्चा येत असतात. परंतू ठाकरे सरकारला पाच वर्षे कसलाही धोका नाही. हे सरकार पाच वर्ष उत्तम काम करेल, असा दावा पवार यांनी केला.

दरम्यान, शरद पवारांनी विरोधी पक्षाला सल्ला देखील दिला. लोकशाहीमध्ये काम करत असताना विरोधी पक्षाने टीका करावी… सरकार जिथे चुकत असेल तिथे सरकारवर त्यांनी बोलावं पण हे बोलत असताना मनामध्ये आकस ठेवता कामा नये, असा सल्ला देत मला फडणवींच्या बोलण्यामध्ये आकस दिसत असल्याचं पवार यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-

शरद पवारांच्या ‘या’ दाव्याने राजकारणात खळबळ, भाजपला हादरा!

महिला पोलिसासोबत गैरवर्तन; मंत्र्याच्या मुलासह 2 जणांना अटक

कोरोनानंतरचा पहिलाच क्रिकेट सामना; ‘या’ संघानं मिळवला थरारक विजय

दडी मारलेला पाऊस करणार दैना; पुढील 4 दिवस ‘या’ भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या