Sharad Pawar | सध्या बारामती मतदारसंघात स्वत: शरद पवार (Sharad Pawar) विधानसभेसाठी कंबर कसून आहेत. ते आता बारामतीमध्ये दुष्काळी दौरे करत आहेत. तसेच शेतकरी मेळाव्यांना आपली उपस्थिती दाखवत आहेत. यावेळी बोलताना शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीवर मोठं वक्तव्य केलं आहे.
“… तर राज्य सरकार कसं हातात येत नाही तेच बघतो”
आज दोन्ही सरकार आमच्या हातात नाहीत. मात्र कालच्या निवडणुकीत जसं काम झालं तसं काम केलं तर राज्य सरकार कसं आपल्या हातात येणार नाही तेच मी बघतो. लोकसभेला जे योग्य होतं ते तुम्ही केलं. विधानसभेला जे योग्य आहे ते करा, असं आवाहन शरद पवारांनी (Sharad Pawar) केलं आहे.
शरद पवार (Sharad Pawar) हे सध्या शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहत आहेत. तसेच ते दुष्काळी दौरा करत आहेत. त्यांनी बारामतीच्या खांडज गावाला भेट दिली आहे. तिथल्या दुष्काळी दौऱ्यावर चर्चा केली. तेव्हा बोलत असताना त्यांनी सत्तेचं उदाहरण दिलं आहे. ते म्हणाले की सत्ता येते आणि जातेसुद्ध…मात्र सत्तेचा वापर हा लोकांसाठी केला तर लोकं आठवण ठेवतात, असं शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले आहेत.
काही लोकं तात्पुरते यशस्वी होतात. मी सांगतो देशाचं लोकशाहीचं राज्य आहे. या निवडणुकीत वेगवेगळं चित्र पाहायला मिळत होतं. गावचे नेते कुठे आहेत? ज्यांना मोठं केलं ते आसपास दिसत नव्हते. मतमोजणी जेव्हा झाली. मतमोजणी केली तेव्हा कळालं की गाव मोठ्या नेत्याच्या हातात नाही. तुम्हाला निवडणुकीत माहिती होतं नेमकं काय करायचं? आता तुमची जबाबदारी आहे. तुमचं पाणी इतकं खराब आहे की त्यात हात देखील घालता वाटत नाही. त्यामुळे आता हे पाणी कसं नीट करता येईल, असं शरद पवार म्हणाले आहेत.
दरम्यान विधानसभा निवडणूक ही येत्या काही महिन्यात लागू शकतात. त्याआधी शरद पवार हे विधानसभेसाठी बारामतीत सक्रिय झाले आहेत. शेतकरी मेळाव्यांना हजेरी लावत आहेत. तसेच दुष्काळ दौरे करत आहेत.
अजित पवार विरूद्ध युगेंद्र पवार यांच्यात लढत?
तसेच यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी बारामतीत लोकसभा निवडणुकी प्रमाणे लढत होणार असल्याची शक्यता आहे. मात्र अद्यापही यावर अधिकृत माहिती समोर आली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते युगेंद्र पवारांचं नाव चर्चेत आहे. तर त्यांच्याविरोधात अजित पवार यांच्यात लढत होणार असल्याची चर्चा आहे.
News Title – Sharad Pawar On Maharashtra Vidhansabha Election 2024 News
महत्त्वाच्या बातम्या
सोनाक्षी सिन्हा मुस्लिम अभिनेत्यासोबत करणार लग्न, भाऊ म्हणाला…
तैमुरसोबत घडला अत्यंत धक्कादायक प्रकार; सैफने घेतला मोठा निर्णय
पाणीपुरी खाणं पडलं महागात, जळगावातील 80 जणांना विषबाधा
श्रद्धा कपूर होणार मोदी घराण्याची सून; जाहीरपणे दिली प्रेमाची कबुली?
शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये न आल्यास ‘या’ हेल्पलाईन नंबरवर करा तक्रार!