मोदींच्या त्या गोष्टीची आता भाजप खासदारही चेष्टा करतात!

पुणे | भारतात येणाऱ्या प्रत्येक पंतप्रधानाला मोदी ज्या पद्धतीने मिठी तो आता चेष्ठेचा विषय झालाय. भाजप खासदारही आता त्याची चर्चा करता, असा खुलासा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. 

इतर देशांचे पंतप्रधान भारतात आले की पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना गुजरात आणि अहमदाबादलाच नेतात इतर राज्यात नेत नाहीत, हे बरोबर आहे का?, असा सवालही त्यांनी यावेळी केला. 

दरम्यान, मोदी ज्या पद्धतीने इतर देशांच्या पंतप्रधानांना मिठी मारतात त्याविषयी भाजपचे खासदार आमच्याशी खासगीत बोलतात, अशी माहितीही शरद पवार यांनी सांगितली.