बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पालिका निवडणुकांच्या तोंडावर शरद पवार पिंपरी चिंचवड दौऱ्यावर!

पुणे | आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शहरात लक्ष घातल्याचं दिसत आहे. येत्या शनिवारी आणि रविवारी शरद पवार दोन दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहेत.

शनिवारी राष्ट्रवादीच्या आजी-माजी नगरसेवकांची बैठक होणार असून रविवारी मेळावा घेण्यात येणार आहे. खुद्द शरद पवार यांच्याकडून पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.

या दोन दिवसीय दौऱ्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे हे उपस्थित असणार आहेत. याबाबतची माहिती राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने शरद पवार शनिवारी आणि रविवारी असे दोन दिवस शहराचा दौरा करतील. शनिवारी दुपारी साडेतीन वाजता आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयात सरकारी योजनेचा नागरिकांना लाभ देण्याच्या उपक्रमाचे उद्घाटन करणार आहेत.

थोडक्यात बातम्या- 

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये भररस्त्यात तुफान हाणामारी

“उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून भाजपची अवस्था वाघाला पाहून भेदरलेल्या मेंढरांसारखी झाली”

रूपालीताई कशा आहेत हे चित्राताई वाघ यांना माहिती असेल त्यामुळे…- चंद्रकांत पाटील

मोठी बातमी! अनंत करमुसे मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाडांना आधी अटक नंतर तत्काळ जामीन

“संजय राऊतांकडे अदृश्य डोळे आहेत, धृतराष्ट्राला जे दिसत नाही ते देखील संजय राऊतांना दिसतं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More