बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तो’ रस्ता भारतासाठी महत्त्वाचा; शरद पवारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सल्ला

मुंबई | चीनसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. या बैठकीनंतर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काही घटनांचा अपवाद वगळता दोन्ही देशांनी शांतता करारच्या अटींचा आदर राखला आहे. सीमाप्रश्नांशी संबंधित असलेल्या माझ्या भूतकाळातील अनुभवाच्या आधारे आणि उपलब्ध माहितीसह मी माझे विचार बैठकीत मांडले, असं शरद पवार यांनी सांगितलं.

चीनने सीमारेषाला मजबूत करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. चीनने 4 हजार किलोमीटरमध्ये अनेक साधने जमा केली आहेत. त्यामुळे भविष्यातही चीन अशाप्रकारचं कृत्य करु शकतो, ही गोष्ट नाकारता येत नाही, असं शरद पवारांनी म्हटलंय.

डब्रुकलापासून डीबीओला जोडणारा रस्ता संपूर्णपणे नियंत्रण रेषेच्या भारतीय बाजूला आहे. भारतासाठी हा रोड महत्त्वपूर्ण आहे, कारण डीबीओला चांगला प्रगत लँडिंग ग्राउंड आहे. या भागात आपत्कालीन परिस्थितीत उपाययोजना करण्यासाठी हवाई दलाला एक चांगलं एअरफील्ड उपलब्ध आहे, असं शरद पवार यांनी सांगितलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

राज्यात आज 3827 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद, पाहा तुमच्या भागात किती?

भारताची 1 इंच जमीनही कोणी घेऊ शकत नाही- नरेंद्र मोदी

महत्वाच्या बातम्या-

‘होम आयोलेशनमुळे कोरोना संसर्गाचा धोका अधिक’; केंद्राकडून होम क्वारंटाईनचे नवे आदेश जारी

राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर; मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे विजयी

आम्ही मजबूर नाही तर मजबूत आहोत, महाराष्ट्र जवानांच्या पाठीशी- उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More