Top News विधानसभा निवडणूक 2019

राफेलला कुणाचा शाप बसेल असं जर कुणाला वाटत असेल तर… – शरद पवार

Loading...

यवतमाळ | याआधी मी नवीन ट्रक घेतला तर त्याला कुणाचा शाप बसू बसू नये म्हणून लिंबू आणि मिर्ची बांधली जायची.पण राफेलला कुणाचा शाप बसेल याची कुणाला चिंता वाटत असेल आणि त्यासाठी कुणी उपाययोजना केल्या असतील तर धन्य आहे, असं राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राज्यभर फिरत आहेत. ते आज यवतमाळमध्ये होते. यवतमाळमध्ये  झालेल्या पत्रकार परिषदेत राफेल विमानाची पूजा केली म्हणून त्यांनी सरकारला टोला लगावला.

Loading...

देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी राफेलची केलेली पूजा अनेकांना रूचलेलं नाही. राफेलवर ओम लिहीलं आणि त्यानंतर राफेलच्या चाकाखाली लिंबू ठेवण्यात आलं. या मुद्यावरून भाजपवर टीका केली जात आहे.

ऐन निवडणुकाच्या तोंडावर  अनेक चेहरे राष्ट्रवादीला सोडून गेले.  त्यानंतर पक्षाला उभारी देण्यासाठी आणि पक्षातल्या नेत्यांच्यात आणि कार्यकर्त्यांच्यात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी खुद्द शरद पवार मैदानात उतरले आहेत. राज्यभर फिरून ते पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेला विविध मुद्द्यांवर धारेवर धरताना दिसत आहेत.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

 

 

Loading...

 

 

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या