पुणे | भारतीय न्यायव्यवस्थेबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश व राज्यसभेचे खासदार रंजन गोगोई यांनी केलेल्या एका विधानामुळे जोरदार खळबळ उडाली. भारताची न्यायव्यवस्था जीर्ण झाली आहे आणि मला न्याय मिळवण्यासाठी मी कधीही न्यायालयात जाणार नाही, असं गंभीर वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर नव्या वादाला सुरुवात झाली आहे.
गेल्याच आठवड्यात माझ्या वाचनात आले होते, की पंतप्रधानांनी न्यायाधीशांसोबत झालेल्या बैठकीमध्ये न्यायव्यवस्था उच्च असल्याचे बोलून दाखवले होते. ते वाचून मला आनंदही झालेला परंतु, गोगोई यांनी केलेले वक्तव्य हे धक्कादायक असून ते प्रत्येकाला चिंता करायला लावणारे आहे, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं. रविवारी ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
न्यायालयात तुम्हाला न्याय मिळत नाही या गोगोई यांच्या वक्तव्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना गोगोई यांनी त्यांच्या सोयीने सत्य मांडण्याचा प्रयत्न केला का? हे मला माहिती नाही, पण असं वक्तव्य करणं अत्यंत गंभीर असल्याची काळजी त्यांनी व्यक्त केली आहे.
रंजन गोगोई यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान अनेक गोष्टींचा उलगडा केला, तसेच मनातील खंत बोलून दाखवली. एवढ्या मोठ्या पदावर राहिलेल्या जबाबदार व्यक्तीच्या अशा वक्तव्यामुळे देशात न्यायव्यवस्थेबद्दल नवी चर्चा सुरु झाली आहे.
थोडक्यात बातम्या-
महाराष्ट्रातील ‘या’ शहरानं रचला इतिहास, पेट्रोलनं शतक ठोकलं!
प्रवासात आजपासून ‘ही’ गोष्ट अनिवार्य, अन्यथा भरावी लागेल दुप्पट रक्कम!
IPLच्या लिलावाआधी अर्जुन तेंडुलकरनं दाखवला चमत्कार, एका षटकात 5 षटकार!
उडता रहाणे! मराठमोळ्या अजिंक्यचा झेल सर्वांना अचंबित करणारा, पाहा व्हिडीओ
चिंताजनक! कोरोनाच्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ, पाहा सविस्तर आकडेवारी