Sharad Pawar l विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. मात्र खोत यांच्या टीकेनंतर महाविकास आघाडीसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खोत यांची चहलीच कानउघाडणी केली होती. मात्र आता शरद पवार पवार यांनी रयत क्रांती सेनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांना मोठा झटका दिला आहे.
सदाभाऊ खोत यांचं टेन्शन वाढलं :
शरद पवारांनी सदाभाऊ खोत यांना चांगलाच धक्का दिला आहे. कारण रयत क्रांती सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी पांडुरंग शिंदे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आहे. यावेळी जळगावमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे. मात्र यावेळी पांडुरंग शिंदे यांनी रयत क्रांती संघटना सोडण्यामागचे कारण देखील सांगितले आहे.
यावेळी रयत क्रांती सेनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी अवघ्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. परंतु मला ही टीका पटली नाही. त्यामुळे मी आता हा पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचं पांडुरंग शिंदे म्हणले आहेत. तसेच सध्या सदाभाऊ खोत हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून देखील लांब गेलेले आहेत. त्यामुळे त्यांचे काम हे व्यक्ती केंद्रीत झाले आहे अशी टीका पांडुरंग शिंदे यांनी केली आहे.
Sharad Pawar l सदाभाऊ खोतांवर कार्यकर्ते नाराज :
याशिवाय सध्या सदाभाऊ खोत यांच्या विषयी पक्षातील अनेक कार्यकर्ते नाराज आहेत. कारण सध्या माझ्या संपर्कात जिल्ह्यातील तब्बल 25 कार्यकर्ते आहेत. मात्र ते देखील लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचा दावा पांडुरंग शिंदे यांनी केला आहे.
मात्र आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्याने सदाभाऊ खोत यांना हा सर्वात मोठा धक्का बसला असल्याचे म्हंटले जात आहे.
News Title – Sharad Pawar On Sadabhau Khot
महत्त्वाच्या बातम्या-
शिंदे गटाचे 8 आमदार, एक मंत्री ठाकरेंकडे परत येणार?
कॉँग्रेसकडून सर्वाधिक मुस्लिम उमेदवार मैदानात, भाजपने किती जणांना दिली संधी?
शरद पवारांनी गेम पलटवला! बड्या नेत्याला मोठा धक्का
…म्हणून भुजबळांना मुख्यमंत्री केलं नाही; शरद पवारांनी सांगितलं कारण
थंडीचा कडाका वाढला असतानाच राज्यावर पावसाचंही सावट, पुढील 3 दिवस..