…हे त्यांना माहीत नसावे; शरद पवारांचा संभाजी भिडेंना टोला

सोलापूर | राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था फारच वाईट आहे, हे कदाचित त्यांना माहीत नसावे, अशा शब्दात शरद पवार यांनी संभाजी भिडे यांना टोला लगावला. ते अकलुजमध्ये बोलत होते. 

काही लोकांनी शेतकरी कर्जमाफीवर टीका केली. 40-40 टन उस उत्पादकांना कर्जमाफी हवी कशाला? असा सवाल केला, मात्र त्यांना शेतकऱ्यांची खरी परिस्थिती माहीत नसावी, असं शरद पवार म्हणाले.

दरम्यान, आम्ही पिकवणारांचा विचार करतो तर सरकार खाणारांचा विचार करते. सरकारने त्यांची धोरणं बदलण्याची गरज आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप सरकारवर ताशेरे ओढले.