आज पाहतो तर सोलापूरच्या विठोबाच्या पायाखालची वीट सरकलीय!

पुणे | पंढरपूरचा विठोबा जसा वीटेवर उभा आहे तसा मी कायमचा तुमच्यासोबत आहे, असं बार्शीच्या सभेत सुशीलकुमारांनी मला सांगितलं होतं. मात्र नंतरच्या काळात त्यांच्या पायाखालची वीट सरकली, अशा शब्दात शरद पवार यांनी सुशीलकुमार शिंदे यांना चिमटे काढले. राज ठाकरे घेत असलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. 

वसंतदादांचं सरकार आम्ही हातात घेतलं. सुशीलकुमार त्यावेळी माझ्यासोबत होते. त्यानंतर आम्ही राज्य देखील चांगलं चालवलं.  नंतर निवडणुका आल्यावर शंकरराव चव्हाण, सुशीलकुमार पुन्हा मूळ काँग्रेसमध्ये गेले. आज आम्ही पाहिलं तर ती वीट सरकली आणि विठोबा आम्हाला सोडून गेला, असं शरद पवार म्हणाले. 

दरम्यान, त्यानंतर मात्र त्यांच्या पायाखालची वीट सरकली नाही. त्यांनी अजूनही काँग्रेस सोडली नाही ही जमेची बाज आहे, असं सांगायलाही शरद पवार विसरले नाही.