राष्ट्रपतीपद नको, मला निवृत्त व्हायचं नाहीये- शरद पवार

पुणे | मला निवृत्त व्हायचं नाहीये, असं सांगत शरद पवार यांनी राष्ट्रपतीपदावर विराजमान होण्यास विरोध दर्शवला. प्रतिभाताई पाटील यांच्या सन्मानार्थ पुण्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

शरद पवार भावी राष्ट्रपती असल्याचं वक्तव्य याच कार्यक्रमात काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केलं होतं. त्यावेळी पवार यांनी हात हलवून त्यांना नकार दर्शवला होता. 

राष्ट्रपती आणि राज्यपाल झाल्यानंतर नेते राजकारणातून निवृत्त होतात आणि मला निवृत्त व्हायचं नाहीये. मला अजून सर्वसामान्य जनतेत रहायचं आहे, अशा शब्दात शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.