फसव्या लोकांसोबत कशाला राहता? नांदता येत नसेल तर वेगळं व्हा!

कराड | उद्धव ठाकरे भाजप सरकारला फसवे म्हणतात हा मोठा विनोद आहे. फसव्या लोकांसोबत तुम्ही राहता कशाला?, एकत्र नांदायचं नसेल तर वेगळे व्हा, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेचा समाचार घेतला. 

भाजप सरकार फसवे असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. याच मुद्द्यावर ते कराडमध्ये बोलत होते.

गुजरातमध्ये भाजपबद्दल प्रचंड नाराजी आहे. मात्र या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैसे आणि सत्ता यांचा वापर केला जाईल, असंही पवार म्हणाले.