शिवसेनेचा पाय सत्तेत अडकलाय, शरद पवारांचं टीकास्त्र

पुणे | फेविकॉलमध्ये जसा पाय अडकतो तसा शिवसेनेचा पाय सत्तेत अडकलाय. तो काही केल्या निघत नाहीये, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं. 

शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय होत नसतील तर सत्तेला लाथ मारेन, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्याची शरद पवार यांनी खिल्ली उडवली. 

दरम्यान, गेल्या तीन वर्षात शेतकरी हिताचे निर्णय झाले नाहीत हे जगजाहीर आहेत. तरीही उद्धव ठाकरे अशाप्रकारचं वक्तव्य करतात. मित्राचे चिरंजिव आहेत त्यामुळे जास्त बोलत नाही, असंही शरद पवार म्हणाले.