Top News पुणे महाराष्ट्र

…म्हणून महाराष्ट्रात महिलांना 50 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला- शरद पवार

पुणे | महाराष्ट्रात पहिला आंतरजातीय अहवाल छत्रपती शाहू महाराजांनी लावला. शाहू महाराजांनी आपल्या बहिणीचा होळकर कुटुंबात विवाह लावला. आज मात्र समाजात जातीय विषमता निर्माण झाली ती दूर करण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक असल्याचं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्राची जबाबदारी असताना मी 50 टक्के महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. अनेकांना ते आवडलं नाही. त्यावेळी एकच उत्तर दिलं. पंडित जवाहरलाल नेहरुंनंतर इंदिरा गांधींनी देशाला ओळख मिळवून दिली. कर्तृत्वाचा मक्ता फक्त पुरुषांकडे नसल्याचं शरद पवार म्हणाले. जेजुरीत अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं उद्धाटन करण्यासाठी आले होते.

अहिल्याबाईंनी जेजुरीच्या खंडेरायच्या परिसराला विकसित करण्याचं काम केलं. त्यांनी हातातील सत्तेचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी केला. 20 वर्षांपूर्वी उमाजी नाईक पुतळ्याचं उद्घाटन आपण केलं. अहिल्याबाई होळकर यांचा पुतळ्याचं उदघाटन ही सन्मानाची बाब असल्याचं शरद पवार म्हणाले. त्यासोबतच त्यांनी अहिल्यादेवी जागतिक स्तरावर छाप सोडणाऱ्या महिला राज्यकर्त्या असल्याचं म्हणाल्या.

दरम्यान, महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातले लोक श्रद्धेने येथे येतात. या प्रांगणात येणाऱ्या प्रत्येकाला हा पुतळा प्रेरणा देईल. हा परिसर व्यवस्थित करण्यासाठी माजी-आजी आमदारांनी प्रयत्न केले. अनेक कामं जेजुरीत होत आहेत हा परिसर अनेक दृष्टीने चांगला होत आहे या गोष्टीचा आनंद वाटत असल्याचंही पवार म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

अजित पवारांनी मान्य केली अजित यशवंतरावांची ‘ती’ मागणी, दिले 1.09 कोटी!

‘मला माझ्या नवऱ्याकडं जायचंय’, चिमुकलीच्या बालहट्टाने तुम्हीही पोट धरून हसाल; पाहा व्हिडीओ

‘हा’ नेता सत्तेत असेपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही- विनायक मेटे

“मराठा-धनगर एकत्र आल्यास, दिल्लीची गादी हस्तगत करु”

…तर आज काश्मिरी तरुण IAS आणि IPS अधिकारी असते- अमित शहा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या