बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच शरद पवारांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पेटारा उघडला, केली मोठी मदत

मुंबई |  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी अनेकजण पुढे येऊन मदत करत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देण्याबाबत पक्षाला सूचना केल्या असल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा आणि विधान परिषदेचे सर्व आमदार तसेच सर्व खासदार एक महिन्याचं वेतन सीएम फंडात देणार आहेत. लसीकरणासाठी मदत व्हावी यासाठी राष्ट्रवादीकडून एकूण दोन कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात येत आहे, असं जयंत पाटील यांनी म्हणाले.

ज्यांना शक्य आहे, ज्यांना लसीचा खर्च परवडणार आहे अशांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करून राज्यावरील आर्थिक भार कमी करावा, असं आवाहनही जयंत पाटील यांनी केलं आहे.महाराष्ट्रात व्यापक लसीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे. लसीकरणाचा खर्च तसेच राज्यावरील आर्थिक बोजा कमी करण्यासाठी सर्वांनी पुढे आलं पाहिजे. या दृष्टीने राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने आज 1 कोटी आणि आमदार, खासदार यांचे महिन्याचे वेतन मिळून 1 कोटी असे दोन कोटी रुपये राष्ट्रवादीकडून देण्यात आले.

दरम्यान,  रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा तुटवडा असो किंवा लसीकरणातली अडचणीची परिस्थिती किंवा ऑक्सिजन पुरवठ्यासंबंधात निर्माण झालेली आपत्कालीन स्थिती रुग्णालयात असतानाही पवारसाहेब रोज परिस्थितीचं अवलोकन करत होते.  त्यासोबतच रुब सातत्याने कोरोना परिस्थितीचा आढावा घेत असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे.

 

 

थोडक्यात बातम्या-  

‘बाळांनो, आम्ही लगेच येतो’ सांगून कोरोना उपचारासाठी गेलेल्या दाम्पत्याला कोरोनाने गाठलं

कडक सॅल्यूट! पत्नीचे दागिने विकून पठ्ठ्याने रिक्षाला बनवलं रुग्णवाहिका

शिक्षक असलेल्या पतीने पत्नीचा आणि 13 महिन्यांच्या मुलाचा गळा चिरुन केला खून; कारण अत्यंत धक्कादायक

कोरोनाने आई, वडिल आणि भवाचा मृत्यू; घरी न जाता रुग्णांची सेवा करत राहिली महिला डॉक्टर

“मोदी सरकारच्या नियोजन शून्य कारभारामुळे 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील लसीकरण होणार नाही हे दुर्दैव”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More