मुंबई | विधिमंडळ अधिवेशनादरम्यान विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अनेक घोषणा केल्या आहेत. आमदारांना घरे देण्याच्या घोषणेनंतर राज्य सरकारला मोठ्या टीकेचा सामना करावा लागत आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता ठाकरेंच्या घोषणेवर आपलं मत व्यक्त केलं आहे. आमदारांना घरे देण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय आहे. आमदारांना घरे देण्यात येवू नयेत, असं माझं वैयक्तिक मत आहे, असं पवार म्हणाले आहेत.
गृहनिर्माण योजनेत कोटा ठरवून आमदारांना घरे द्या. या निर्णयाबाबत आपण मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं आहे. विरोधकांच्या टीकेला आपण किंमत देत नाही, असंही पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, आमदार निवासाची व्यवस्था असताना मुंबईत आमदारांना घरे देण्यामागचं प्रयोजन काय आहे, असा सवाल नागरिक सरकारला विचारत आहेत.
थोडक्यात बातम्या –
“आम्ही राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसवर प्रचंड नाराज आहोत”
रात्री झोपताना ही गोष्ट करत असाल तर आरोग्यावर होतील ‘हे’ गंभीर परिणाम, वेळीच व्हा सावध
नवाब मलिक प्रकरणी ठाकरे सरकारनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय
वाढत्या महागाईमुळे काॅंग्रेसचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, म्हणाले…
“आमदारांना घरे देण्याचा निर्णय झाला नाही”; ठाकरे सरकारचा यु-टर्न
Comments are closed.