Top News महाराष्ट्र मुंबई

अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणाला पार्थ पवार यांच्या शुभेच्छा, म्हणाले…

मुंबई | अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी पत्र लिहून राम मंदिरावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अयोध्येत श्री राम जन्मभूमीचे भुमिपूजन होत आहे. श्रद्धा आणि सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक असलेले श्री राम अखेरीस शांतपणे आपल्या घरी येतील. हा लढा कडवट आणि प्रदीर्घ होता. अखेरीस एक पूर्ण पिढी एका ऐतिहासिक दिवसापशी येऊन ठेपली आहे. त्यामुळे आपण हिंदू श्रद्धेच्या पुनर्स्थापनेचा क्षण अनुभवणार आहोत, असं पार्थ पवारांनी पत्रात म्हटलं आहे.

पार्थ पवार यांनी अयोध्येत राम मंदिर निर्माणाला शुभेच्छा दिल्या. तसेच आपण राम जन्मभूमी प्रकरणातून एक मोठा धडा शिकला पाहिजे, असं आवाहनही पार्थ पवार यांनी नागरिकांना केलं.

काही सत्यांचा आपल्याला विसर पडता कामा नये. या देशाच्या तरुण पिढीने राम जन्मभूमीच्या पवित्र भूमीवरुन सुरु झालेली शाब्दिक लढाई कायदेशीर आणि ऐतिहासिक पाहिली आहे. राम जन्मभूमीच्या या जुन्या प्रकरणावर लोकशाही व्यवस्थेअंतर्गत सामंजस्य आणि शांततामय मार्गाने तोडगा निघाला हेही आपण पाहिलं. यातून आपल्याला एक बोध घेता येईल. या देशाच्या ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांनी काही संस्था उभ्या केल्या. त्या संस्थांवर आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि संयमाने वागले पाहिजे, असं पार्थ पवारांनी पत्रात म्हटलंय.

दरम्यान, विजयात आपण विनम्र असलं पाहिजे. युक्तिवाद कितीही तर्कहीन, सदोष किंवा दुबळे असले तरीही बाबरी मशिदीविषयी एक भावना होती. जे हरले त्यांचा आपण सन्मान केला पाहिजे. त्यांचे तर्क आणि दावे पूर्णपणे पराभूत झाले आहेतच. आता आपण थोडे पुढे गेले पाहिजे. आपला पराभव झाला आहे असं ज्यांना वाटत आहे त्यांना या विजयाच्या क्षणी आपण बरोबर घेतलं पाहिजे, असं पार्थ पवार यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

पार्थ पवारांच्या राम मंदिर निर्माणाला शुभेच्छा, सुप्रिया सुळे म्हणाल्या…

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण; “संजय राऊत अन् आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा”

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण

वाढदिवसानिमित्त अभिनेत्री सहनूरने 30 हजार सॅनिटरी पॅडचं केलं वाटप

टिकटॉक खरेदीसाठी मायक्रोसॉफ्ट नाहीतर ‘ही’ मोठी कंपनी तयार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या