बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सचिन वाझे प्रकरणावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….

बारामती | एपीआय सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे प्रकरण स्थानिक आहे. मी त्यावर जास्त बोलणे योग्य ठरणार नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते बारामतीमध्ये माध्यमांशी बोलत होते. सचिन वाझे यांच्या अटकेविषयी प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा शरद पवारांनी यावर फार बोलण्यास स्पष्टपणे नकार दिला.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरून विरोधकांनी सभागृहात घातलेल्या गोंधळानंतर शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात वाझे यांची भूमिका संशयास्पद असल्याने गेल्या काही दिवसांपासून ते एटीएस आणि एनआयएच्या रडारवर होते. तसेच  NIAच्या हाती काहीतरी सबळ पुरावा लागल्याचं बोललं जात आहे. सचिन वाझेंनंतर आता ठाण्यातील एका राजकीय नेत्याची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाण्यातील हा नेता आणि सचिन वाझे यांचे आर्थिक संबंध होते. त्यामुळे आता याप्रकरणात आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

थोडक्यात बातम्या- 

.‘स्फोटकांची कार लावण्यात सचिन वाझेंचा थेट सहभाग’; NIAचे वाझेंवर गंभीर आरोप

अभिनेत्री सायली संजीवचा बोल्ड अंदाज, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

सचिन वाझेंनंतर ठाण्यातील एका नेत्याची चौकशी होणार?

“सचिन वाझे यांची नार्को टेस्ट करा, दूध का दूध पानी का पानी होऊन जाऊ दे”

राजस्थानवरून आलेल्या त्या 180 वऱ्हाड्यांनी वाढवलं पालघरचं टेंशन; इतक्या जणांना कोरोनाची लागण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More