बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते, मलाही ईडीची नोटीस पाठवली होती…”

सोलापूर | कालपासून अजित पवारांच्या निकटवर्तीय आणि नातेवाईकांच्या कारखाने व कंपन्यावर पडलेल्या आयकर विभागाच्या धाडीचीच सर्वत्र चर्चा रंगू लागली आहे. त्यातच ही कारवाई लखीमपूर खीरीच्या घटनेवर केलेल्या वक्तव्यामुळे घडवून आणलेली असू शकते, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली होती.

आज सकाळी माध्यमांशी बोलत असताना घरातील पाहुणे गेल्यानंतर या विषयावर भाष्य करणार असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. परंतू आता शरद पवार यांनी आपल्या खास शैलीत या कारवाईवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. lत्यामुळे सध्या याच प्रकरणाची सर्वत्र मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे.

‘सरकारी पाहुणे अजित पवारांकडे आले, पण पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते, मलाही मी ज्या बँकेचा सदस्य नाही त्यावरून ईडीची नोटीस पाठवली होती, मला ईडी पाठवली लोकांनी त्यांनाच वेडी ठरवलं’, अशा शब्दात शरद पवारांनी सोलापूरात बोलत असताना तुफान टोलेबाजी केली आहे.

‘सध्याचे राज्यकर्ते हे सत्तेचा गैरवापर करत आहेत, जनता यांना चांगलाच धडा शिकवेल’, असं म्हणत शरद पवारांनी भाजपवर निशाणा साधल्याचं यावेळी पाहायला मिळालं. या छापेमारीनंतर आता नेमकं पुढे काय होणार? याकडे राजकीय वर्तुळासह एकुणच राज्याचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या

“लांबलांब जीभा काढून बडबड करण्याची काही लोकांना सवय लागली”

भाजप विरूद्ध राष्ट्रवादी सामना रंगणार?, नवाब मलिकांचं भाजपला खुलं आव्हान

सैनिकहो तुमच्यासाठी!; देशसेवा करणाऱ्या सैनिकांचा अभूतपूर्व सन्मान सोहळा

मोठी बातमी! प्राप्तिकर विभागाकडून 1050 कोटी रूपयांचा घोटाळा उघड

‘हे ही दिवस जातील, अपना टाईम भी आयेगा’, पवारांवरच्या छापेमारीवर संजय राऊत म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More